मरकजचा कार्यक्रम वेळीच रोखला असता तर ही परिस्थिती उद्भवली नसती – अमित शहा

मरकजचा कार्यक्रम वेळीच रोखला असता तर ही परिस्थिती उद्भवली नसती – अमित शहा

मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळातील पहिलं वर्ष शनिवारी पूर्ण झालं. दरम्यान, त्यांनी लॉकडाऊन, देशाची सद्य अर्थव्यवस्था आणि कोरोना विषाणूसारख्या मुद्द्यांशी संबंधित प्रत्येक प्रश्नांची उत्तरे दिली. गृहमंत्र्यांनी मरकज प्रकरणावर भाष्य केलं आहे. दिल्लीत झालेला तबलीगी जमातचा मरकजचा कार्यक्रम वेळीच रोखला असता तर अशी परिस्थिती झाली नसती, अशी कबूली गृहमंत्री अमित अमित शहा यांनी दिली.

अमित अमित शहा म्हणाले की, मरकजमध्ये वर्षभर असे कार्यक्रम आयोजित केले जातात. हा सार्वजनिक कार्यक्रम नव्हता. मरकजच्या आत एक कार्यक्रम होता. पण आम्ही वेळीच कार्यक्रम रोखला असता आणि वैद्यकीय मदत दिली असती तर कदाचित ही परिस्थिती उद्भवली नसती, अशी कबूली ‘आज तक’ या वृत्तसंस्थएशई बोलताना दिली. कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी २५ मार्चपासून देशात लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. तथापि लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात काही घटना घडल्या ज्यामुळे कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढली. यामध्ये दिल्लीच्या निजामुद्दीनमध्ये असलेल्या तबलीगी जमातच्या मरकजचा देखील समावेश आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेशसारख्या राज्यांच्या सरकारने मरकजला कोरोना प्रकरणातील वाढीसाठी जबाबदार धरलं होतं.


हेही वाचा – गुजरात, महाराष्ट्राला वादळाचा इशारा


केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शहा म्हणाले की, सर्व सरकारांनी ज्या-ज्या वेळी आपत्ती आली किंवा एखाद्या साथीचा आजार आला त्याविरोधात लढा दिला आहे. प्रत्येक वेळी सरकारांनी बदल घडवून आणला, परंतु यावेळी संपूर्ण देश लढा देत आहे. जनता कर्फ्यू, थाळी आणि कोरोना वॉरियर्सचा सन्मान करून लोकांनी या साथीच्या विरोधात देशाला बळकटी दिली.

 

First Published on: May 31, 2020 6:36 PM
Exit mobile version