गोवंश तस्करीच्या संशयावरून अमरावतीच्या तरुणाची मध्य प्रदेशात हत्या

गोवंश तस्करीच्या संशयावरून अमरावतीच्या तरुणाची मध्य प्रदेशात हत्या

गोवंश तस्करी प्रकरणी संशयावरून मध्यप्रदेशात माणसांच्या जमावाने एका तरुणाला मारहाण केली. त्यातच त्या तरुणाला प्राण गमवावे लागल्याची घटना घडली आहे. अमरावतीच्या एका तरुणाला वरण गमवावे लागेल आहेत. नर्मदापूरम हुशंगाबाद जिह्ल्यातील शिवनी मालवा इथल्या बाराखडी गावात ही घटना अघडल्याचं वृत्त समोर आलं. दरम्यान या ठिकाणी ट्रकचा अपघात झाला या अपघातग्रस्त ट्रकमधील तरुणांवर मंगळवारी रात्री जमावाने हलला केला.

हे ही वाचा – एकनाथ शिंदे केंद्रात जाऊन मुजरा करणारे नेते, अंबादास दानवेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

एका ट्रकमधून गोवंशाची तस्करी होत आहे असा संशय जमावाला आला. गायींनी भरलेलया या ट्रक चा शिवनी मालवा येथे अपघात झाला. त्यावेळी ट्रक मध्ये २८गायी होत्या.गायींना कत्तलीसाठी नेण्यात येत आहे असा संशय आल्याने संतप्त गावकऱ्यांनी ट्रकमधील तरुणांवर हल्ला केला. याच संदर्भांत पोलिसांनी माहिती दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकमध्ये असलेल्या तीन तरुणांना दहा ते बारा लोकांनी मोठ्या प्रमाणावर मारहाण केली. ही घटना घडली तेव्हा जागीच एका तरुणाचा मृत्यू झाला तर इतर दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. नाझीर अहमद असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान तरुणांना मारहाण करणाऱ्या दहा ते बारा आरोपींविरुद्ध कलमी ३०२ अंतर्गत मध्य प्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या सर्वांचा पोलीस युद्ध पातळीवर शोध घेत आहेत.

हे ही वाचा – सेल्फीसाठी जीव गेला तरी बेहत्तर; पाण्याच्या ठिकाणी स्टंटबाजी सुरूच

जमावाच्या मारहाणीत जखमी झालेल्या ट्रक चालकाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच एसीपी आणि कलेक्टर यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचे गांभीर्य समजून घेतले. एसीपी गुरु करून सिंह यांनी सांगितले की रात्री सडे बाराच्या सुमारास ही घटना घडली. ट्रकमधून गोवंशाची तस्करी करण्याच्या संशयावरून दहा ते बारा लोकांनी तीन तरुणांना मारहाण करणार केली. त्यातील अमरावतीच्या एक तरुणाचा मृत्यू झाला.

हे ही वाचा – नाशिक जिल्हयातील पाच धरणे ओव्हरफ्लो पाच दिवसांत पाणीसाठयात 40 टक्केे वाढ

First Published on: August 4, 2022 2:18 PM
Exit mobile version