दिल्लीसह देशातील ‘या’ राज्यांत ‘अमूल बटर’चा तुटवडा; सोशल मीडियावर तक्रारींचा पूर

दिल्लीसह देशातील ‘या’ राज्यांत ‘अमूल बटर’चा तुटवडा; सोशल मीडियावर तक्रारींचा पूर

दिल्ली, अहमदाबाद आणि पंजाबसह देशातील अनेक राज्यांमध्ये ग्राहक आणि दुकानदारांना बाजारात अमूल बटरचा तुटवडा जाणवत आहे. अमूल बटर किराणा अॅपवरही उपलब्ध नाही. यासोबत अमूल क्रीम आणि अमूल तुपाचा पुरवठाही कमी झाला आहे. अमूल प्रोडक्टच्या उत्पादनांच्या टंचाईमुळे बनावट अमूल बटर बाजारात विक्रीसाठी येत आहे. यावरून आता ग्राहक आणि दुकानदारांचा सोशल मीडियावर तक्रारींचा पूर आला आहे. याबाबत कंपनीकडूनही कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नाही.

मात्र कंपनीतील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवरून सांगितले की, दिवाळीच्या काळात अमूल उत्पादनांची मागणी वाढल्याने सध्या अमूल बटरच्या पुरवठ्यात अडचणी येत आहेत. मात्र हा पुरवठा काही दिवसांत सुरळीत होईल.

दिल्लीतील दुकानांत अमूल बटरचा ठणठणाट

गेल्या 20-25 दिवसांपासून बाजारात अमूल बटर उपलब्ध नाही आणि डिस्ट्रीब्यूटर पुरवठ्याच्या कमतरतेचे कारण देत आहेत. याचा परिणाम दुकानदारांच्या विक्रीवरही होत आहे. त्यामुळे आता अमूल बटर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणात परत पाठवावे लागत आहे. मात्र अमूलचे दूध नेहमीप्रमाणे उपलब्ध असून त्याच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम झाला नाही, अमूल क्रीम आणि तुपाच्या पुरवठ्यावरही परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले.

पंजाबचे केशव चौधरी यांनी ट्विटरवर लिहिले की, ‘ गुरुदासपूरामधील बटाला शहरात अमूल बटरचा तुटवडा का आहे? असे सर्वत्र का आहे का?

अहमदाबादमधील @peeleraja या ट्विटर युजर्सने म्हटले की, ‘अहमदाबादमध्ये कुठेही दही मिळत नाही. अमूलसह दुग्धशाळा पुरेशा प्रमाणात उत्पादन करत नाहीत का? दुकानदार म्हणतात की, हा तुटवडा आठवडाभर टिकू शकतो.

सोशल मीडियावर ग्राहकांकडून तक्रारांचा पूर

सोशल मीडियावरील युजर्सही अमूल उत्पादनांची कमतरता आणि बाजारात बनावट उत्पादने विकत असल्याच्या तक्रारी करत आहेत. अमूल क्रीमचा तुटवडा असल्याच्या तक्रारीही काही जण करत आहेत. मुंबई, दिल्ली, काश्मीर, अहमदाबाद, पंजाब आणि उत्तर प्रदेशातील अनेक भागातील लोक अमूलचे दूध वगळता इतर प्रोडक्ट मिळत नसल्याची तक्रार करत आहेत. अमूल बटर मिल्कबास्केट, बिगबास्केट आणि फ्लिपकार्ट सारख्या अनेक किराणा स्टोरवरही अमूलची प्रोडक्ट्स उपलब्ध नाही. गुरुग्राममध्ये ब्लिंकिटवर अमूल बटरची लिस्टिंग नाही.


अखेर संजय राऊत तुरुंगाच्या बाहेर येणारच, हायकोर्टाचा जामिनीच्या स्थगितीस नकार


First Published on: November 9, 2022 5:13 PM
Exit mobile version