घरमहाराष्ट्रअखेर संजय राऊत तुरुंगाच्या बाहेर येणारच, हायकोर्टाचा जामिनीच्या स्थगितीस नकार

अखेर संजय राऊत तुरुंगाच्या बाहेर येणारच, हायकोर्टाचा जामिनीच्या स्थगितीस नकार

Subscribe

मुंबई – गेल्या १०२ दिवसांपासून ईडीच्या अटकेत असलेल्या संजय राऊतांच्या (Sanjay Raut) सुटकेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. पीएमएलए कोर्टाने आज त्यांना जामीन दिला. मात्र, या जामिनाविरोधात इडीने याचिका दाखल केली. पीएमएलए कोर्टाने ईडीची ही याचिका फेटाळून लावली. त्यामुळे ईडीने याविरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतली. मुंबई हायकोर्टानेही संजय राऊतांना दिलासा दिला आहे. त्यानुसार, संजय राऊत आज सायंकाळी सात वाजेपर्यंत तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, राऊतांच्या सुटकेचे आदेश जेलबाहेरील पेटीत टाकण्यात आले आहेत.

हेही वाचा -राऊतांना झालेली अटक बेकायदेशीर, पीएमएलए कोर्टाने ईडीला झापलं

- Advertisement -

कथित पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना 31 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून संजय राऊत तुरुंगात आहेत. अटक केल्यानंतर संजय राऊत यांना सुरुवातीला ईडीची कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर संजय राऊत यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या अटकेनंतर संजय राऊत आर्थर रोड कारागृहामध्येच होते.

ईडीने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती भारती डोंगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यांनी जामीन आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. कलम ४३९(२) प्रकरणी उद्या सुनावणी करण्यात येईल. जर, तुम्हाला कलम 482 अंतर्गत स्थगिती हवी असेल तर तो वेगळा भाग आहे, तुम्ही कलम 482 अंतर्गतातील याचिका घेऊन माझ्याकडे आला नाही. ते अधिकार क्षेत्र वेगळे आहे,” न्यायमूर्ती डोंगरे म्हणाल्या.

- Advertisement -

हेही वाचा – पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात खासदार संजय राऊतांना जामीन मंजूर

उच्च न्यायालयाला कलम ४८२ सीआरपीसी कलम ४३९ नुसार जामिनाचा आदेश स्थगित करण्याचा अधिकार असताना, ईडीची याचिका कलम ४३९ अंतर्गत मर्यादित होती, असंही न्यायमूर्ती म्हणाल्या.

काय आहे प्रकरण?

याप्रकरणी ईडीने अधिक तपास करत पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणात राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप केला होता. मात्र राऊतांचा या घोटाळ्याशी काहीच संबंध नाही असा युक्तीवाद राऊतांच्या वकिलांनी केला. परंतु, ईडीकडून राऊत हेच घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचा दावा केला गेला.

दरम्यान, आज झालेल्या सुनावणीत संजय राऊत यांना कोर्टाने जामीन मंजूर केला. पंरतु, या जामीनाला ईडीने विरोध केला होता. ईडीने केलेली याचिका पीएमएलए कोर्टाने फेटाळून लावल्याने ईडीने याविरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतली. मुंबई हायकोर्टानेही ईडीची याचिका फेटाळून लावत संजय राऊतांच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला. संजय राऊतांच्या सुटकेचे आदेश निघताच आर्थर रोड तुरुंगाबाहेरअसलेल्या पत्रपेटीत हे आदेश पत्र टाकण्यात आले आहे. त्यानुसार, आज सायंकाळी सात वाजेपर्यंत सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर ते बाहेर येतील, अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिली.

कोर्टाने ईडीला झापलं

संजय राऊतांच्या जामीन अर्जावर स्थगिती अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायलायने नकार दिला. न्यायालयीन प्रक्रियेच्या बाहेर जाऊन आम्ही सुनावणी घेऊ शकत नाही, असं म्हणत कोर्टाने ईडीचे कान टोचले. त्यामुळे या जामीन अर्जावर तातडीने स्थगिती आणता येणार नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे. याप्रकरणी उद्या सकाळी पुन्हा सुनावणी घेण्यात येणार आहे.

शिवसेना भवनात जल्लोष साजरा करणार

जवळपास गेल्या तीन महिन्यांपासून तुरुंगात असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. या जामिनानंतर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाकडून जल्लोष साजरा केला जात आहे. अशातच शिवसेनाभवन येथे जल्लोष साजरा करण्यात येणार आहे. जामिनावरून सुटल्यानंतर संजय राऊत सिद्धीविनायकाचे दर्शन घेऊ मातोश्रीवर जाणार असल्याचं सांगण्यात येतंय.

 

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -