अमूलच्या ग्राहकांना फटका; अमूल दूध २ रुपयांने महागणार

अमूलच्या ग्राहकांना फटका; अमूल दूध २ रुपयांने महागणार

देशभरात प्रसिद्ध असलेल्या अमूल ब्रॅण्डचे दूध महागले असून कंपनीने दुधाच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ केली आहे. हा नवा दर उद्यापासून म्हणजे २१ मे पासून लागू होणार आहे. त्यामुळे अमूलच्या ग्राहकांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे.

गुजरात राज्य दूध उत्पादक संघाचा ‘अमूल’ हा ब्रॅण्ड असून गुजरात को-ऑपरेटीव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडचे (GCMMF) व्यवस्थापकीय संचालक आर. एस. सोधी यांनी सोमवारी आपल्या कंपनीच्या दूधाच्या दरवाढीची घोषणा केली आहे. त्यानुसार, आता उद्यापासून अमूल दूध प्रतिलिटर दोन रुपयांनी महागणार आहे.

First Published on: May 20, 2019 9:45 PM
Exit mobile version