Omicron Variant: डोळ्यासंबंधित ‘ही’ लक्षणे दिसतायत, तर करू नका दुर्लक्ष; असू शकतो ओमिक्रॉनचा संसर्ग

Omicron Variant: डोळ्यासंबंधित ‘ही’ लक्षणे दिसतायत, तर करू नका दुर्लक्ष; असू शकतो ओमिक्रॉनचा संसर्ग

Omicron Variant: डोळ्यासंबंधित 'ही' लक्षणे दिसतायत, तर करू नका दुर्लक्ष; असू शकतो ओमिक्रॉनचा संसर्ग

कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेल्या काही रुग्णांमध्ये डोळ्यांसंबंधित लक्षणे समोर आली आहेत. सर्दी, खोकला, ताप अशा अनेक लक्षणांशिवाय ओमिक्रॉनची लागण झाल्यामुळे डोळ्यासंबंधित समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला डोळ्यासंबंधित कोणते लक्षणे दिसेल ज्याकडे दुर्लक्ष केले नाही पाहिजे हे सांगणार आहोत.

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

डोळ्यासंबंधित समस्या कमी दिसणे हे लक्षणे असल्याचे म्हटले गेले आहे. यामध्ये डोळ्यासंबंधित एक किंवा त्यापेक्षा जास्त समस्या असू शकतात. जर तुम्ही ओमिक्रॉन संक्रमित असाल तर तुमचे डोळे लालसर होतील, डोळ्यांच्या पांढऱ्या भागावर आणि डोळ्यावर सूज येईल. तसेच डोळ्यांत जळजळ होण्यासारख्या समस्या दिसू शकतात. याशिवाय काही रुग्णांना धुरकट दिसणे, डोळ्यातून पाणी वाहणे या समस्या जाणवतात. ओमिक्रॉन संक्रमित असलेल्या रुग्णांमध्ये ५ टक्के डोळ्यासंबंधित समस्या दिसतात.

दरम्यान डोळ्यासंबंधित लक्षणांवर तुम्हाला ओमिक्रॉनची लागण झाली आहे, असे म्हणता येणार नाही. कधीकधी डोळ्यांच्या समस्या इतर कारणांमुळे देखील असू शकतात, म्हणून कोरोनाची इतर लक्षणे देखील पाहा. पण याचा अर्थ असा नाही की, कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष केले पाहिजे.

डोळ्यांना आराम मिळण्यासाठी…

कोरोनाची लागण झालेल्या लोकांमध्ये डोळ्यांशी संबंधित लक्षणे काही वेळेला सामान्य असतात, तर काही लोकांना यामुळे जास्त त्रास होऊ शकतो. म्हणून, स्वच्छ कापसाने डोळे ओले करा आणि ते पुसून टाका, यामुळे तुम्हाला आराम मिळेल.


हेही वाचा – Omicron Variant: ओमिक्रॉनच्या सब व्हेरिएंट BA.2 मुळे वैज्ञानिकांमध्ये दहशत! भारतासह ४० देशांमध्ये धोक्याची घंटा


 

First Published on: January 23, 2022 4:22 PM
Exit mobile version