राजकीय निवृत्तीनंतरही जेटली म्हणायचे, ‘मोदी है तो मूमकीन है!’

राजकीय निवृत्तीनंतरही जेटली म्हणायचे, ‘मोदी है तो मूमकीन है!’

राजकीय निवृत्तीनंतरही जेटली म्हणायचे, 'मोदी है तो मूमकीन है!'

देशाचे माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे वयाच्या ६७व्या वर्षी निधन झाले आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. जेटली गेल्या काही महिन्यांपासून कर्करोगाने त्रस्त होते. त्यांना मांडीतील पेशींचा कॅन्सर झाला होता. कॅन्सरचे निदान झाल्यानंतर ते उपचारासाठी न्यूयॉर्कला देखील जाऊन आले. तिथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. अरुण जेटली किडनीच्या आजाराने देखील त्रस्त होते. गेल्या वर्षी १४ मे २०१८ रोजी त्यांची एम्स हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. प्रकृतीच्या तक्रारींमुळे त्यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या सत्रात भाग घेतला नाही. परंतु, मोदी सरकारच्या कार्यप्रणालीचे त्यांनी नेहमीच कौतुक केले. याशिवाय मोदी सरकारला भक्कम पाठिंबा त्यांनी राजकारणातून निवृत्त झाल्यानंतरही दिला.

जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० आणि ३५ अ रद्द करण्याचा प्रस्ताव लोकसभेत आणि राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर अरुण जेटली यांनी ट्विटरवर पंतप्रदान नरेंद्र मोदींचे आणि गृहमंत्री अमित शहा यांचे कौतुक केले होते. मोदी सरकारने करुन दाखवलं. मोदी है तो मुमकीन है हे मोदी सरकारने सिद्ध करुमन दाखवला. काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द झाल्याचा आपल्याला अत्यानंद झाल्याचेही ते म्हणाले होते.


हेही वाचा – विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष ते अर्थमंत्री; जेटलींचा प्रेरणादायी प्रवास!

First Published on: August 24, 2019 2:53 PM
Exit mobile version