Video : AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसींच्या गाडीवर टोल नाक्यावर चार राऊंडर फायर

Video : AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसींच्या गाडीवर टोल नाक्यावर चार राऊंडर फायर

ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर उत्तर प्रदेशातील पिलखुवा येथे हल्ला झाल्याचा दावा करण्यात आला आहे. खुद्द ओवैसी यांनी ट्वीट करत, ही हल्ल्याची माहिती जाहीर केली आहे. काही वेळापूर्वीच माझ्या गाडीवर छिजारसी टोल गेटवर गोळ्या चालवण्यात आल्या. त्यामध्ये ४ राउंड फायर झाली. एकुण तीन ते चार जणांच्या गटाने माझ्यावर हल्ला केला. त्यानंतर सर्वच लोक शस्त्र सोडून पळून गेले. या हल्ल्यात माझी गाडीही पंक्चर झाली आहे. त्यानंतर मी दुसरी गाडी घेऊन याठिकाणाहून निघालो. जब अल्लाह बचाना चाहता है तो कोई कुछ नहीं कर सकता अशीही प्रतिक्रिया त्यांनी दिली.

एनएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार मेरठच्या किठौरी येथे एक निवडणूकीच्या कार्यक्रमानंतर दिल्लीला ओवैसी निघाले होते. छिजारसी टोल प्लाजा नजीक दोन लोकांनी त्यांच्या गाडीवर ३ ते ४ राऊंड फायर केले. या हल्ल्यात गाडीचा टायरही पंक्चर झाल्याची माहिती समोर आली आहे. याआधी दिवसभरात ओवैसी हे डोअर डोअर कॅम्पेनसाठी घरोघरी गेले होते. त्यानंतर परततानाच हा हल्ला झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

मेरठ येथे प्रचार करत आहेत ओवेसी

याआधी ओवेसी यांनी मुख्यमंत्री योगी यांच्या गर्मीच्या वक्तव्यावर खुलासा केला होता. मुख्यमंत्र्यांना सांगू शकतो की, जी गर्मी ओवैसीने तयार केली आहे, ती अनेक वर्षे कायम राहील असे ते म्हणाले होते. ओवैसी हे मेरठ शहरातील विधानसभा क्षेत्रात इस्लामाबाद नावाच्या भागात प्रचारासाठी आले होते. त्यांच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात समर्थकांची गर्दी झाली होती. भागिदारी सांगत मुस्लिमांना धोका दिला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. सपा बसपा हे भाजपपेक्षा कमी नाहीत. पण जो मुस्लिम आतापर्यंत जिंकत आले, ते मुके आणि बहिरे बनून राहिले, असाही आरोप ओवैसींनी केला.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गेल्या काही दिवसात ओवेसींवर हल्ला चढवत वादग्रस्त वक्तव्य केले होते. कैराना आणि मुजफ्फरनगर येथे जी गर्मी दिसत आहे, ही सर्व गर्मी शांत होईल. मे आणि जूनमध्येही ही गर्मी शिमला करेन असा दावा योगींनी केला होता.


 

First Published on: February 3, 2022 8:05 PM
Exit mobile version