मोदी सरकार तिरंग्यातून हिरवा रंग काढू शकते का?, बिल्कीस बानोला न्याय मिळेल का?; ओवैसींचा सवाल

मोदी सरकार तिरंग्यातून हिरवा रंग काढू शकते का?, बिल्कीस बानोला न्याय मिळेल का?; ओवैसींचा सवाल

एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. मोदी सरकारला हिरव्या रंगाचा इतका त्रास का आहे? मोदी सरकार तिरंग्यातून हिरवा रंग काढू शकते का? बिल्कीस बानोला न्याय मिळेल का?, असा सवाल असदुद्दीन ओवैसी यांनी मोदी सरकारला विचारला आहे.

केंद्रातील सरकारला मुस्लिमांची बिलकूल चिंता नाही. त्यांची दखल सरकार बिलकूल घेत नाही. देशात मुस्लिमांशी भेदभाव केला जात आहे. बिल्किस बानोला न्याय मिळाला नाही कारण ती मुस्लिम आहे. मुस्लिमांना जीवे मारण्याची धमकी दिली जात नाही, असा एकही महिना नाही. मुस्लिम मुलांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती कमी करण्यात आली आहे. निधी ४० टक्के कमी करण्यात आला, असं ओवैसी म्हणाले.

बिल्किस बानोच्या दोषींची सुटका करण्यात आली. कारण ती मुस्लिम महिला आहे. जर बिल्किस बानो मुस्लिम नसत्या तर त्यांना न्याय मिळाला असता. त्या २० वर्षांपासून लढत आहेत. पण तुम्ही तिला न्याय देऊ इच्छित नाही, असं ओवैसी म्हणाले. पंतप्रधान मोदी चीनवर एकही शब्द बोलत नाहीत. त्यांनी इंदिरा गांधींकडून धडा घेतला पाहिजे. त्यांना निष्ठावंत न्यायव्यवस्था हवी होती आणि मोदींनाही तेच हवे आहे.

अदानी यांचे नाव न घेता ओवैसी म्हणाले की, काँग्रेस आणि भाजप या दोघांनी कुलीनशाही वर्ग निर्माण केला. देशातील एक टक्के लोकांकडे ६० टक्के संपत्ती आहे. त्यामुळेच काही मोजक्याच लोकांना संधी मिळाली आहे.


हेही वाचा : काँग्रेसच्या काळात दहशतवाद, हिंसाचार वाढला; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल


 

First Published on: February 8, 2023 7:43 PM
Exit mobile version