चुकीचा आरोप करणाऱ्यांविरोधात कारवाई करणार – आशिष पांडे

चुकीचा आरोप करणाऱ्यांविरोधात कारवाई करणार – आशिष पांडे

चुकीचा आरोप करणाऱ्यांविरोधात कारवाई करणार - आशिष पांडे

दिल्लीतल्या एका फाइव्ह स्टार हॉटेल समोर बंदूक काढूण मुजोरी करण्याचा सीसीटीव्ही फुटेज दोन दिवसांपासून सर्व माध्यमांवर झळकत आहे. हॉटेल समोर तरुणीला बंदूक दाखवणारा इसम हा दिल्लीच्या एका बड्या राजकारणीचा मुलगा असल्याचे समोर आले आहे. त्याचे नाव आशिष पांडे असून तो बहुजन समाजवादी पार्टीच्या माजी खासदारांचा मुलगा आहे. दोन दिवसांनंतर आशिषने या घटनेवर स्पष्टीकरण दिले आहे. त्याने आज पटियाला हाऊस कोर्टात स्वता:ला स्वाधिन केले आहे. आपले वडील राजकारणी असल्यामुळे या घटनेकडे विरोधी पक्षवाले नको तो चुकीचा आरोप करत आहेत. त्यामुळे चुकीचा आरोप करणाऱ्यांविरोधात आपण कडक कारवाई करणार असल्याची माहिती त्याने दिली आहे. दरम्यान, कोर्टाने त्याला एक दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे.

‘घटनेची एकच बाजू बघितली जात आहे’

आशिषने घटना घडल्याची कबुली दिली आहे. परंतु, ‘या घटनेची एकच बाजूचा विचार केला जात आहे. या घटनेच्या दुसऱ्याही बाजूचा विचार करायला हवा. सीसीटीव्ही फुटेजचे व्हिडिओ बघितले तर त्या दिवशी लेडिज टॉयलेटमध्ये काय झालं होतं, ते समजेल. मी या गोष्टीला मान्य करतो की, स्वयंम संरक्षणासाठी मी त्यावेळी बंदूक बाहेर काढली होती. परंतु, मी ती बंदूक कुणावरही उचलली नव्हती. पुर्णवेळ बंदूक मागेच होती’, असं आशिष म्हणाला.

‘माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे’

आशिष म्हणाला की, ‘मी त्या मुलीसोबत कुठल्याही प्रकारे अश्लील चाळे केले नाहीत. मी तिच्याकडे लक्ष देखील दिले नाही. उलट त्याच मुलीने मला धक्का दिला. तिच्या जोडीदाराने मला शिवीगाळ दिल्या’. पोलीस चौकशीत मी या सगळ्या गोष्टी सांगणार आहे. माझा देशाच्या न्यायव्यवस्थेवर संपूर्ण विश्वास आहे, असं देखील तो म्हणाला.

हेही वाचा – दादा-भाईंच्या कमरेला महासभेतही पिस्तूल!
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात चार पोलीस शहीद
First Published on: October 18, 2018 5:26 PM
Exit mobile version