आशिया कप २०२२: क्रिकेटच्या मैदानावर भारत – पाकिस्तान आज भिडणार

आशिया कप २०२२: क्रिकेटच्या मैदानावर भारत – पाकिस्तान आज भिडणार

दुबई- जगभरातील तमाम क्रिकेटप्रमेंची उत्कंठा वाढविणाऱ्या भारत आणि पाकिस्तान या दोन्ही पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये आज रविवारी क्रिकेटचा सामना रंगणार आहे. आशिया चषक स्पर्धेला सुरुवात झाली असून आज सायंकाळी साडेसाड वाजता भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत.

जवळपास वर्षभराच्या अवधीनंतर हे दोन्ही देश एकमेकांविरोधात आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत एकमेकांविरोधात मैदानावर भिडणार आहेत. दुबई येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअमवर सायंकाळी ७.३० वाजल्यापासून या सामन्याला सुरुवात होणार आहे. २४ ऑक्टोबर २०२१ रोजी पार पडलेल्या टी-२० आंतरराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धेच्या सामन्यात पाकिस्तानने याच मैदानावर भारतावर १० गडी राखून विजय मिळविला होता. कोणत्याही विश्वचषकाच्या स्पर्धेच्या सामन्यात पाकिस्तानाने भारतातवर सरशी करण्याची ही पहिलीच वेळ होती. १० गडी राखून पराभूत होण्याचा लाजीरवाणा पराभव कोट्यवधी भारतीयांच्या जिव्हारी लागला होता. परंतु या पराभवाची परतफेड करण्यासाठी संधी आता भारतीय संघाकडे असून पाकिस्तानला या सामन्यात प्रत्युत्तर देण्यासाठी कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील संघ सज्ज झाला आहे.

हेही वाचा – IND vs PAK : सामन्यापूर्वी विराट कोहलीबाबतची रोनाल्डोची खास पोस्ट चर्चेत

आशिया चषकातील भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याला काही तासच शिल्लक असतानाच शनिवारी भारताने आपला संघ जाहीर केला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या इंस्टाग्रामवर संघातील ११ खेळाडूंचे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे हेच भारताचे ११ खेळाडू पाकिस्तानविरुद्ध सामन्यात खेळायला उतरणार असल्याचे समजले जाते. या ११ खेळाडूंमध्ये कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, यष्टिरक्षक रिषभ पंत, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, आवेश खान आणि अर्शदीप सिंग यांचा समावेश करण्यात आलेला आहे. बीसीआयने ज्या खेळाडूंचे फोटो यावेळी पोस्ट केले आहेत तेच या सामन्यात खेळतील की नाही, याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा जेव्हा नाणेफेकीसाठी मैदानात उतरेल आणि त्यानंतर आपला संघ जाहीर करेल, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकप्राप्त क्रीडापटूंच्या बक्षीस रकमेत वाढ, गिरीश महाजनांची घोषणा

First Published on: August 28, 2022 9:42 AM
Exit mobile version