घरक्रीडाIND vs PAK : सामन्यापूर्वी विराट कोहलीबाबतची रोनाल्डोची खास पोस्ट चर्चेत

IND vs PAK : सामन्यापूर्वी विराट कोहलीबाबतची रोनाल्डोची खास पोस्ट चर्चेत

Subscribe

भारतीय क्रिकेट संघ सध्या आशिया चषक स्पर्धेसाठी यूएईमध्ये आहे. भारतीय या स्पर्धेतील पहिला सामना 28 ऑगस्टला पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. यापूर्वी सोशल मीडियावर विराट कोहलीच्या जोरदार पुनरागमनाची चर्चा रंगली आहे. अनेक दिग्गजांना आशा आहे की विराट खराब फॉर्ममधून परत येईल.

भारतीय क्रिकेट संघ सध्या आशिया चषक स्पर्धेसाठी यूएईमध्ये आहे. भारतीय या स्पर्धेतील पहिला सामना 28 ऑगस्टला पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. यापूर्वी सोशल मीडियावर विराट कोहलीच्या जोरदार पुनरागमनाची चर्चा रंगली आहे. अनेक दिग्गजांना आशा आहे की विराट खराब फॉर्ममधून परत येईल. दरम्यान, जगप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोची कोहलीला शुभेच्छा देणारी एक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. (cristiano ronaldo shared virat kohli photo the truth of the post came out)

रोनाल्डोने आपल्या पोस्टमध्ये “संडे द किंग प्ले”, असे लिहिले आहे. चाहत्यांनी ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. दरम्यान, रोनाल्डोची अशीच एक पोस्ट पाकिस्तान स्टार बाबर आझमसाठी देखील समोर आली आहे. यामध्ये बाबरच्या फोटोसह रोनाल्डोचा रविवारी किंगचे पुनरागमन असा संदेश शेअर करण्यात आला आहे.

- Advertisement -

रोनाल्डोने मँचेस्टर युनायटेडच्या आगामी सामन्यापूर्वी सराव सत्रात या कॅप्शनसह त्याचा फोटो शेअर केल्याचे उघड झाले. विराट कोहली आणि बाबर आझमच्या चाहत्यांनी ते आपल्या स्टार खेळाडूंशी जोडून सोशल मीडियावर व्हायरल केले.

आशिया चषक 2022 चा उद्याचा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. दुबईच्या ज्या स्टेडीयममध्ये हा सामना होणार आहे. त्यामध्ये भारताच्या कटू आठवणी आहेत. याच स्टेडीयमवर गतवर्षी झालेल्या टी-20 विश्वचषकात दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 10 गडी राखून पराभव केला होता. तसेच, विश्वचषकातील पहिला विजय नोंदवला होता. मात्र, आता पुन्हा एकदा भारतीय संघ आशिया चषकामध्ये पाकिस्तानशी मुकाबला करणार आहे. त्यामुळे सर्वत्र ‘मौका… मौका’, असे बोलले जात आहे. त्यामुळे भारतीय संघ उद्याचा सामना जिकणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकप्राप्त क्रीडापटूंच्या बक्षीस रकमेत वाढ, गिरीश महाजनांची घोषणा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -