Assembly Elections 2021- मोदींच्या लसीकरणापेक्षा पेहरावाचीच चर्चा

Assembly Elections 2021- मोदींच्या लसीकरणापेक्षा पेहरावाचीच चर्चा

देशभरात आज कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दिल्लीच्या एम्स रुग्णालयात जाऊन कोरोना लस घेतली. मात्र यावेळी मोदींनी जो पेहराव केला होता त्यात राजकीय संदेश दडल्याची चर्चा आहे.

कारण लस घेताना मोदींनी खांद्यावर जे उपरणं घेतलं होतं ते आसामचं आहे. तर त्यांना ज्या नर्सेसना लस दिली त्यातील पी निवेदा या पुद्दुचेरीच्या असून दुसरी नर्से रोसम्मा अनिल या केरळच्या आहेत.

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. आजचा मोदींचा पेहराव देखील या राज्याच्या संस्कृतीबरोबर मिळताजुळता होता. तसेच नर्सेसही विधानसभा निवडणुका होणाऱ्या राज्यांमधील आहेत. हा नक्की योगायोग की जुळवून आणलेला संयोग आहे.

कारण २ मे रोजी पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. आजचा मोदींचा पेहराव देखील या राज्याच्या संस्कृतीबरोबर मिळताजुळता होता. तसेच नर्सेसही विधानसभा निवडणुका होणाऱ्या राज्यांमधील आहेत. हा नक्की योगायोग की जुळवून आणलेला संयोग आहे. अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

First Published on: March 1, 2021 1:14 PM
Exit mobile version