चीनमध्ये होतायत मुस्लिमांवर अत्याचार; यूएनने सादर केलेला अहवाल खोटा असल्याचा चीनचा दावा

चीनमध्ये होतायत मुस्लिमांवर अत्याचार; यूएनने सादर केलेला अहवाल खोटा असल्याचा चीनचा दावा

यूएन मानवाधिकाराच्या अहवालानुसार, चीन आपल्या शिनजियांग प्रांतात मुस्लिमांवर अत्याचार करत आहे. तो जागतिक संस्थेत दहशतवादाचा अप्रत्यक्ष समर्थक असल्याचे दिसून येत आहे, तर आपल्याच देशात दहशतवादाच्या नावाखाली मुस्लिमांवर दडपशाही करत आहे. चीनवर जारी करण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार अहवालात चीन दहशतवाद आणि अतिरेकींविरोधात कारवाई करण्याच्या नावाखाली अत्याचार करत असल्याचा मोठा दावा करण्यात आला आहे. चीन मधील शिनजियांगमध्ये मुस्लिम महिलांवर अत्याचार आणि पुरुषांची सक्तीने नसबंदी केल्याच्या धक्काधदायक घटना घडत आहेत.

हे ही वाचा –  डी कंपनी NIA च्या रडारवर; दाऊद इब्राहिमवर 25 लाख तर छोटा शकीलवर ठेवले 20 लाखांचे बक्षीस

यूएन मानवाधिकारचे आयुक्त मिशेल बॅचेलेट यांनी त्यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 31 ऑगस्ट रोजी चीनमधील मानवाधिकारांवरील बहुप्रतिक्षित अहवाल प्रसिद्ध केला. चीनने त्यात केलेले दावे मात्र मिशेल यांनी फेटाळून लावले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार अहवालात चीनवर मानवाधिकारांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन केल्याचा दावा करण्यात आला आहे. हे मानवतेविरुद्धचे गुन्हे आहेत. चीनच्या दुर्गम शिनजियांग प्रांतातील मुस्लिम अल्पसंख्याकांच्या 48 पानांच्या अहवालात मोठ्या संख्येने उइगर मुस्लिम बेपत्ता असल्याचा दावा सुद्धा करण्यात आला आहे.

हॅ ही वाचा – भारतीय गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याने पोर्तुगालच्या आरोग्यमंत्र्यांनी दिला राजीनामा

अहवालात म्हटल्याप्रमाणे, उइघुर आणि इतर प्रमुख मुस्लिम वंशांच्या सदस्यांना मनमानी आणि भेदभावपूर्ण नजरकैदेत ठेवणे, वैयक्तिक आणि सामूहिकरित्या उपभोगल्या जाणार्‍या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन हा मानवतेविरुद्ध आंतरराष्ट्रीय गुन्हा आहे. उइगर मुस्लिमांना बळजबरीने तुरुंगात डांबण्यात आले आहे. सुरक्षा कायद्यांची मनमानीपणे अंमलबजावणी करून अल्पसंख्याकांवर अत्याचार करत आहे. याच संदर्भांत असे म्हटले जाते की 1 दशलक्ष लोक कैद आहेत.

हा गुन्हा आंतराष्ट्रीय आहे : UN

यूएनने आपल्या अहवालात चीनला सर्व बेकायदेशीरपणे कैदेत असलेल्या उइगरांची मुस्लिमांची तात्काळ सुटका करण्याचे आवाहन केले आहे. अल्पसंख्याकांवरील कारवाई हा आंतरराष्ट्रीय गुन्हा म्हणून मानवतेविरुद्धचा गुन्हा आहे. संयुक्त राष्ट्रांचा हा अहवाल चीनवर नवा आंतरराष्ट्रीय दबाव आणणारा ठरू शकतो.

बनावट अहवाल : चीन

हा अहवाल खोटा असून तो चुकीच्या माहितीवर बनवलेला आहे त्याच बरोबर चीनविरोधी शक्तींनी खोट्या गोष्टी नमूद करून हा बनावट अहवाल बनवला आहे असं म्हणत चीनने हा अहवाल फेटाळून लावला. चीनची बदनामी करणारा हा अहवाल जाहीर करू नये अशी विनंती सुद्धा चीनने यापूर्वी संयुक्त राष्ट्रांना केली होती.

हे ही वाचा – इस्रायल- इराणमध्ये युद्धाचे ढग! इस्रायलचा सीरियाच्या अलेप्पो विमानतळासह दोन एअरपोर्ट इमारतींवर हल्ला

First Published on: September 1, 2022 12:43 PM
Exit mobile version