घरदेश-विदेशडी कंपनी NIA च्या रडारवर; दाऊद इब्राहिमवर 25 लाख तर छोटा शकीलवर...

डी कंपनी NIA च्या रडारवर; दाऊद इब्राहिमवर 25 लाख तर छोटा शकीलवर ठेवले 20 लाखांचे बक्षीस

Subscribe

दाऊद हा भारताचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार असून त्याला पाकिस्तानने आश्रय दिल्याचे सांगितले जाते

नवी दिल्ली – राष्ट्रीय तपास संस्थेने डी कंपनीवर मोठी कारवाई करत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर 25 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. तर दाऊदचा राईट हँड कुख्यात गुंड छोटा शकीलवर 20 लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. दाऊद इब्राहिम गँगमधील इतर सदस्यांवरही एनआयएने बक्षीस जाहीर केले आहे. या गँगमधील अन्य तीन सदस्य टायगर मेमन, अनीस इब्राहिम आणि जावेद चिकना यांच्यावर प्रत्येकी 15 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

दरम्यान दाऊद इब्राहिम भारतात शस्त्रे, स्फोटके, ड्रग्ज आणि बनावट भारतीय नोटांची तस्करी करण्यासाठी एक विशेष युनिट तयार करत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती, तसेच पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आणि काही दहशतवादी संघटनाही त्याला यात मदत करत असल्याची माहिती देखील समोर आली होती. यामुळे एनआयए सतर्क झाली असून भारताने जाहीर केलेल्या मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांवर बक्षीस जाहीर केले आहे.

- Advertisement -

दरम्यान दाऊदच्या विशेष युनिटचा उद्देश पाक गुप्तचर संस्था आयएसआय आणि इतर दहशतवादी संघटनांच्या सहकार्याने भारतात दहशतवादी कारवाया करणे हा आहे. तसेच डी गँग काही राजकीय नेते आणि व्यावसायिकांना देखील लक्ष्य करण्यासाठी याचा वापर करू शकते.

दाऊदची ही टीम भारतात सध्या अस्तित्वात असलेल्या लष्कर, जेएम आणि अल-कायदासारख्या दहशतवादी संघटनांच्या दहशतवाद्यांना आणि स्लीपर सेललाही मदत करणार असल्याची माहिती समोर आली आहे. जेणेकरून भारतविरोधी हल्ले करता येतील. या वर्षाच्या सुरुवातीला एनआयएने 29 ठिकाणी छापे टाकले होते. सर्वाधिक छापे मुंबईत टाकण्यात आले.

- Advertisement -

दरम्यान पाकिस्तानाच्या कराचीमध्ये लपवून बसलेल्या दाऊदचा 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटात हात होता. भारतातील अनेक दहशतवादी कारवाया करत वाँटेड झालेल्या दाऊदवर 2003 मध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने
25 लाख डॉलरचे बक्षीस जाहीर केले. दाऊद हा भारताचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार असून त्याला पाकिस्तानने आश्रय दिल्याचे सांगितले जाते. दाऊदचे लष्कर-ए-तैयबा (एलईटी) प्रमुख हाफिज सईद, जैश-ए-मोहम्मद (जेएम) प्रमुख मौलाना मसूद अझहर, हिजबुल मुजाहिदीनचा संस्थापक सय्यद सलाहुद्दीन आणि त्याचा जवळचा सहकारी अब्दुल रऊफ असगर यांच्याशी जवळचा संबंध आहे.


इस्रायल- इराणमध्ये युद्धाचे ढग! इस्रायलचा सीरियाच्या अलेप्पो विमानतळासह दोन एअरपोर्ट इमारतींवर हल्ला

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -