अटारी बॉर्डरजवळ पोलीस आणि गँगस्टरमध्ये चकमक, सिद्धू मुसेवालाचा हल्लेखोर ठार

अटारी बॉर्डरजवळ पोलीस आणि गँगस्टरमध्ये चकमक, सिद्धू मुसेवालाचा हल्लेखोर ठार

पंजाबी गायक सिंद्धू मूसेवाला हत्या प्रकरणातील आरोपी आणि पंजाब पोलीसांच्यात अटारी बॉर्डरजवळ चकमक झाली. या चकमकीत सिंद्धू मूसेवालाचे हल्लेखोर जगरूप सिंह रुपा आणि मनप्रीत सिंह उर्फ ​​मन्नू कुसाचा पोलीसांनी एनकाऊंटर केला. चकमकीत तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून चार आरोपी ठार झाले.

भारत पाक सीमेच्या बाजूने पोलीसांच्या टीमला मदत पोहोचवली जात आहे. एका जुन्या इमारतीत जगरूप सिंह रूपा आणि मन्नू कूसा लपले होते.दोन तासापासून या परिसरात चकमक सुरू आहे. यावरून आरोपींकडे मोठ्या प्रमाणात दारुगोळा असल्याचा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे.

गैंगस्टर जगरूप सिंह रूपा आणि मन्नू कूसा असल्याची सूचना मिळाल्यानंतर पोलीसांची टीम घटनास्थळी पोहोचली. त्यानंतर दोन्ही बाजूनी गोळीबार सुरू झाला. मन्नू कूसा एके-47 ने फायरिंग करत होता. या चकमकीत 3 पोलीस जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सिद्धू मूसेवालाच्या हत्ये नंतर पोलीसांनी अॅक्शन घेत अनेक गैंगस्टरला अटक केली होती. फक्त हे दोघेच फरार होते. यातील एकाचा पोलीसांनी एनकाउंटर केला.

First Published on: July 20, 2022 3:33 PM
Exit mobile version