पाकिस्तानात हिंदू देवी-देवतांच्या मूर्तींवर अज्ञातांकडून हल्ला

पाकिस्तानात हिंदू देवी-देवतांच्या मूर्तींवर अज्ञातांकडून हल्ला

पाकिस्तानात पुन्हा एकदा हिंदू मंदिरांवर निशाना साधण्याच्या घटना समोर आल्या आहेत. पाकिस्तानातील कराची येथील एका हिंदू मंदिरामध्ये देवी-देवतांच्या मूर्तींना इजा पोहोचवण्यात आली आहे. पाकिस्तानमधील अल्पसंख्यांक समुदायाच्या धार्मिक स्थळांवर पाकिस्तानातील काही विकृत लोकांकडून इजा पोहोचवली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कराचीच्या कोरंगी परिसरातल्या श्री मारी माता मंदिरामध्ये बुधवारी ८ जून रोजी देवी-देवतांच्या मूर्त्यांवर हल्ला करण्यात आला.

हिंदू समुदायात भीतीचे वातावरण
सूत्रांच्या मते, या घटनेमुळे कराची येथे राहणाऱ्या हिंदू समुदायामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे कोरंगी परिसरात या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना तैनात करण्यात आले आहे.

६ ते ८ लोकांनी केला मंदिरावर हल्ला
या परिसरात राहणाऱ्या हिंदू निवासी संजीवने एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, मोटारसायकल वरून येऊन ६ ते ८ लोक या परिसरात अचानक आले आणि मंदिरावर हल्ला करायला सुरूवात केली. त्यांनी सांगितले की, आम्हाला
ठाऊक नाही की, हा हल्ला कुणी आणि का केला. संजीव यांनी सांगितले की, त्यांनी या घटनेनंतर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे.

पाकिस्तानात हिंदू मंदिरावर निशाणा
पाकिस्तानामध्ये अल्पसंख्याक हिंदू लोकसंख्येच्या मंदिरांवर सतत हल्ले केले जातात. मागील वर्षी ओक्टोंबरमध्ये सुद्धा कोटरीमध्ये सिंधू नदीच्या काटावर स्थित एका ऐतिहासिक मंदिराला अज्ञात लोकांकडून अपवित्र करण्यात आले होते.

श्रीगणेश मंदिरामध्ये सुद्धा झाली होती तोडफोड
गेल्या वर्षा ऑगस्ट महिन्यामध्ये भोंग शहरामधील गणेश मंदिरावर हल्ला केला होता.

पाकिस्तानात ९० लाखांपेक्षा जास्त हिंदू
सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानात ७५ लाख हिंदू लोक राहतात, मात्र तिथल्या लोकांच्या माहितीनुसार पाकिस्तानात ९० लाखांपेक्षा जास्त हिंदू राहतात. पाकिस्तानात जास्त हिंदू लोकसंख्या सिंध प्रांतामध्ये स्थित आहे.

 


हेही वाचा :आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी दिल्ली पोलीस अॅक्शन मोडमध्ये; असदुद्दीन ओवैसी आणि स्वामी नरसिंहानंद यांच्यावर गुन्हा दाखल

First Published on: June 9, 2022 4:04 PM
Exit mobile version