त्या घटनेनंतर या देवीच्या मंदिरात नतमस्तक होऊन औरंगजेबने मागितली होती माफी

त्या घटनेनंतर या देवीच्या मंदिरात नतमस्तक होऊन औरंगजेबने मागितली होती माफी

राजस्थानातील सीकर जिल्ह्याच्या रालावता गावात जीन माता देवीच्या मंदिराला भारतातील अनेक भाविक आर्वजून भेट देतात. हे मंदिर खूप पुरातन असून प्रसिद्ध देखील आहे. या मंदिराबाबत अनेक चमत्कारी कथा प्रचलित आहेत. शिवाय असं म्हटलं जात की, या मंदिरामध्ये काही भाविक देवीला प्रसाद म्हणून मद्य देखील अर्पण करतात.

खरं तर, हे मंदिर रालावता गावातील अरावली डोंगराच्या मध्यभागी स्थित आहे. या ठिकाणी जीनमाता देवीला चमत्कारांची देवी म्हटलं जातं. त्यामुळे चक्क मुघल बादशाह औरंगजेबाने देखील देवीची माफी मागितली होती.

मुघल बादशाह औरंगजेबाने का मागितली देवीची माफी?

एका प्रचिलत कथेनुसार, जेव्हा मुघल आक्रमणकर्ते भारतातील हिंदू मंदिरांवर हल्ले करुन ते नष्ट करत होते, त्यावेळी काही मंदिरं मोडण्यात मुघल सम्राटांना अपयश आले आणि त्यांना काही परिणामांना सामोरे जावे लागले. राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात असलेले जीनमाता मंदिर हे देखील असेच एक मंदिर आहे. मुघल सम्राट औरंगजेबाच्या सैन्याने येथे पोहोचून हे देवी मंदिर पाडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी औरंगजेबाच्या सैनिकांवर मधमाश्यांनी हल्ला करत जीनमातेने चमत्कार दाखवला. या मधमाश्यांच्या हल्ल्यापासून मुघल सैन्य पळून गेले आणि त्यामुळे हे मंदिर सुरक्षित राहिले.

असं म्हटलं जातं की, या घटनेनंतर मुघल बादशाह औरंगजेबाने जीनमाता देवीची माफी मागितली. इतकंच नव्हे तर, तेव्हापासून तो आपल्या दरबारातून प्रत्येक महिन्याला देवीच्या मंदिरात 1/2 मण तेल पाठवू लागला. ही परंपरा अनेक काळ सुरु होती.

 


हेही वाचा :

भारतातील ‘या’ ठिकाणी आजही दररोज सूर्योदयानंतर येतात श्री राम!

First Published on: March 23, 2023 3:48 PM
Exit mobile version