Ayodhya verdict: पंतप्रधान मोदींचे अयोध्या निकालानंतरचे पहिले ट्विट

Ayodhya verdict: पंतप्रधान मोदींचे अयोध्या निकालानंतरचे पहिले ट्विट

अयोध्येतील वादग्रस्त जागेवर रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर आज सर्वोच्च न्यायालय आज शनिवारी, निकाल दिला असून सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठ आज निकाल जाहीर केला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्यात यावे तसेच ५ एकर जमीन देण्यात येणार आहे. या निकालाचे सर्वच स्तरातून स्वागत होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील ट्विट केले आहे.

“देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणावर आपला निर्णय सांगितला असून या निर्णयाला कोणाचाही विजय-पराजय समजले जाऊ नये. रामभक्ती किंवा रहीमभक्ती, ही वेळ आपली भारतभक्ती अधिक बळकट करण्याचा आहे. देशातील नागरिकांनी शांतता, सद्भावना आणि एकता कायम राखावी”, असे ट्विटमध्ये सांगत मोदींनी समस्त जनतेला अहवान केले आहे.


Ayodhya Verdict : जाणून घ्या काय आहे ‘अयोध्या’ प्रकरण
First Published on: November 9, 2019 1:31 PM
Exit mobile version