‘बाबा का ढाबा’चे मालक कांती प्रसाद यांचा आत्महत्येचा प्रयत्न, परिस्थिती गंभीर असल्याने रुग्णालयात दाखल

‘बाबा का ढाबा’चे मालक कांती प्रसाद यांचा आत्महत्येचा प्रयत्न, परिस्थिती गंभीर असल्याने रुग्णालयात दाखल

'बाबा का ढाबा'चे मालक कांती प्रसाद यांचा आत्महत्येचा प्रयत्न, परिस्थिती गंभीर असल्याने रुग्णालयात दाखल

कोरोना काळात सोशल मीडियावरून सर्वाधिक चर्चेत आलेले दिल्लीतील ‘बाबा का ढाबा’चे मालक कांता प्रसाद यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. परिस्थिता गंभीर असल्याने त्यांना सफदरजंग रुग्णालयात उपाचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. दिल्लीतील मालवीय नगरचे रहिवासी असलेले कांता प्रसाद यांनी गुरुवारी रात्री दारु पिऊन झोपेच्या गोळ्या    घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर परिस्थिती नाजूक झाल्याने गुरुवारी रात्री उशीरा त्यांना रुग्णालायात भर्ती केल्याची माहिती समोर येत आहे.

दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री ११.१५ च्या सुमारास कांती प्रसाद यांना सफदरजंग दाखल करण्यात आल्यती माहिती मिळाली, यावेळी कांता प्रसाद यांनी दारु पिऊन झोपेच्या गोळ्या एकत्र घेतल्या. कांता प्रसाद यांच्या मुलानेही पोलीस जबाबात असेच सांगितले आहे. रुग्णालयाच्या रिपोर्टमध्ये ते बेशुद्ध असल्याचे लिहिले आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांकडून अधिकचा तपास सध्या सुरु आहे.

कांता प्रसाद रातोरात झाले सोशल मीडिया स्टार 

कोरोनादरम्यान गौरव वासव या युट्युबरने कांता प्रसाद यांच्या ‘बाबा का ढाबा’चा एक व्हिडिओ शूट करुन आपल्या युट्यूब अकाउंटवर पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये या ढाब्यात काम करणाऱ्या वयस्कर कांता प्रसाद आणि त्यांची पत्नी बदामी देवी एवढ्या उतार वयात कसे काम करत आहेत याची खरी परिस्थिती सांगण्यात आली होती. या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिले आणि रातोरात कांता प्रसाद यांचासह त्यांचा ‘बाबा का ढाबा’ प्रसिद्धी झोतात आला. त्यावेळी कोरोनामुळे अडचणीत आलेला कांता प्रसाद यांचा ‘बाबा का ढाबा’ सावरण्यासाठी अनेकांनी मदत केली. तसेच त्यांच्या ढाब्याबाहेर लोकांची खाण्यासाठी, सेल्फी घेण्यासाठी गर्दी जमू लागली. दरम्यान कांता प्रसाद यांना मिळालेल्या पैशातून स्वत:चे रेस्टॉरंटही सुरु केले. परंतु या प्रसिध्दीनंतर गौरव वासवसह कांता प्रसाद यांचे वाद समोर आले. युट्युबर गौरव वासनवर मिळालेल्या मदतीतून पैसे खाल्याचे आरोप झाले. त्याच्याविरोधात मिळालेल्या पैशांच्या मदतीत गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु गौरव वासनने हे सर्व आरोप फेटाळून लावले आणि आपले बँक स्टेटमेंट जाहीर केले. गौरववर लावण्यात आलेल्या आरोपानंतर मोठ्या संख्येने लोकांनी बाबांच्या ढाब्यावर जाणे थांबवले होते, त्यानंतर कांता प्रसाद यांनीही माफी मागितली होती.

याचदरम्यान कांती प्रसाद यांनी सुरु केलेले रेस्टॉरंट डिसेंबर २०२० मध्ये बंद पडले. यामुळे कांती प्रसाद यांनी आपल्या जुन्या ढाब्यावर जाणे पसंत केले. यानंतर गौरव वासन पुन्हा एकदा कांता प्रसादांना भेटायला पोहोचला व त्याने आपल्या मनात तुमच्या विषयी कुठलाही राग नसल्याचे म्हणत प्रकरणं मिटवले. परंतु या सर्व घटनेला काही दिवस उलटत नाही तोवर गुरुवारी कांती प्रसाद यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.


मुंबईतील बड्या सोसायट्यांमध्ये सुरुयं बनावट लसीकरण, पुरवठादारास उत्तरप्रदेशातून अटक


 

First Published on: June 18, 2021 3:58 PM
Exit mobile version