गौतम गंभीरला होणार अटक?

गौतम गंभीरला होणार अटक?

गौतम गंभीर (सौजन्य- जनसत्ता)

माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याला कोर्टाचा अवमान करणे भारी पडले आहे. कोर्टाने त्याला फसवणुकीसंदर्भात बुधवारी वॉरंट जारी केले आहे. एका रिअल इस्टेट कंपनीमुळे त्याच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. या संदर्भातील सुनावणीसाठी त्याला कोर्टात जाणे अनिवार्य होते. पण तो गैरहजर राहिल्याने त्याच्यावर जामीनपात्र वॉरंट दिल्ली कोर्टाने जारी केले आहे.

नेमकं प्रकरण काय?

गौतम गंभीर रुद्रा बिल्डवेल रिअॅलिटी या रिअल इस्टेट कंपनीचा ब्रँड अँम्बेसडर आहे. या कंपनीचे मालक मुकेश खुराना आणि एचआर इंफ्रासिटी प्रायव्हेट लिमिटेडचे मालक गौतम मेहता यांनी माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांना घेऊन त्यांच्या बिल्डींग प्रोजेक्टची जाहिरात केली. लोकांना घराचे स्वप्न दाखवून त्यांच्याकडून पैसे घेतले. पण पैसे घेऊनही ग्राहकांना घरे दिली नाहीत. त्यामुळे ग्राहकांनी त्यांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी पोलिसांत नोंदवल्याचे पोलिसांनी सांगितले. गौतम गंभीर यांच्या नावाचा उपयोग करुन त्यांनी ग्राहकांना बांधून ठेवले, असे देखील पोलिसांनी सांगितले. या संदर्भात गौतम गंभीरला कोर्टात येणे बंधनकारक होते. पण तो आला नाही.

वाचा- सावधान! गृहउद्योगाच्या नावाने हजारो महिलांची फसवणूक

म्हणून जारी केले वॉरंट

दिल्लीतील कोर्टात सध्या या संदर्भात सुनावणी सुरु आहे. सुनावणीसाठी गौतम गंभीर हजर राहणे आवश्यक होते. पण तो दोनदा या सुनावणीसाठी आला नाही. त्यामुळे कोर्टाने त्याला जामीनपत्र वॉरंट जारी केला आहे. शिवाय कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी १० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. पुढील सुनावणी २४ जानेवारी २०१९ला होणार असून गौतम या सुनावणीला गैजहजर राहिल्यास त्याच्या अडचणीत वाढ होण्याच शक्यता आहे.

बंदी असलेल्या औषधांच्या विक्रीचे आमिष दाखवून फसवणूक
First Published on: December 20, 2018 9:25 AM
Exit mobile version