घरमहाराष्ट्रसावधान! गृहउद्योगाच्या नावाने हजारो महिलांची फसवणूक

सावधान! गृहउद्योगाच्या नावाने हजारो महिलांची फसवणूक

Subscribe

काम देतो या बहाण्याने संस्था स्थापन केली. या संस्थेचा सभासद होण्यासाठी त्याने प्रति ६५१ रुपये महिलांकडून घेतले. राज्यभरातील एकूण ४५ हजार महिलांकडून त्याने प्रति ६५१ रुपये घेतले आहे.

घरातील सर्व कामे सांभाळून काही महिला गृहउद्योग करतात. पापड बनवणं, मसाला बनवणं, लसून सोलणं यांसारखे अनेक गृहउद्योग महिला घरबसल्या करत असतात. काही महिलांची घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्या महिला दोन पैसे मिळावे या हेतूने गृहउद्योग करतात. परंतु, आता या गरिब, होतकरु महिलांनाही गृहउद्योग करताना सावधानतेचा इशारा देण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत नोकरीसाठी फसवणूक करणाऱ्यांच्या बऱ्याच घटना घडल्या आहेत. सध्या या फसवणूक करणाऱ्या ठगांची दिशाच बदलत जाताना दिसत आहे. या ठगांनी थेट गृहिणींना लक्ष्य केले आहे. त्यामुळे आता गृहिंणींनी गृहउद्योग करताना सावधानता बाळगण्याचा असा सल्ला देण्याची वेळ माध्यमांवरती आली.

काय आहे प्रकरण?

काम देतो या बहाण्याने काही भामट्यांनी पुण्यात वर्ल्ड ट्रस्ट डायमनी या संस्थेची स्थापना केली. या संस्थेने महिलांचा गट स्थापन केला. त्यांना कापडी पिशव्या बनवण्याचे काम देतो असे सांगितले आणि त्यांना संस्थेचे सभासद होण्यास भाग पाडत त्यांच्याकडून सभासद फिज घेतली. हे पैसे ६५१ रुपये इतके होते. महिलांनी ६५१ रुपयांत काम मिळत असल्याचे विचार करत पैसे देऊन टाकले. काम मिळाले म्हणून महिलांनी जास्त चौकशी केली नाही. परंतु, जेव्हा तयार केलेल्या पिशव्या महिलांनी कंपनीला दिल्या आणि कंपनीकडून पैसे आले नाहीत, तेव्हा महिलांनी चौकशी करण्यास सुरुवात केली. महिलांनी यासंदर्भात संस्थेचे संस्थापक मनीष लोकरस आणि त्याची साहाय्यिका जयश्री कोपर्डेकर यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी भेटण्यास टाळाटाळ केला. याउलट या संस्थापकांनी आपल्या संस्थेचे कार्यलय बंद केले. कार्यालय बंद केल्याने लोकांचा संशय बळावला आणि त्यांनी संस्थेच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.

- Advertisement -

पैसे गुंतवण्याचेही आश्वासन

मनीष लोकरस याने महिलांना पैसे गुंतवण्याचेही आश्वासन केले होते. तुम्ही पैसे गुंतवा, तुम्हाला कमी काळामध्ये जास्त पैसे मिळवून देतो, जास्त व्याज देतो, असे आश्वासन लोकरसने दिले. महिलांनी जास्त व्याजाच्या आमिषात त्याला २० हजार ते ३० हजार रुपये दिले. त्याचबरोबर या संस्थेने १५० महिलांच्या गटाकडून प्रति ६५१ रुपये प्रमाणे ९७ हजार रुपये घेतले. त्याने आपल्या संस्थेचे कार्यालय राज्यभरातील विविध भागांमध्ये सुरु केली. राज्यभरातील एकूण ४५ हजार महिलांकडून त्याने प्रति ६५१ रुपये घेतले आहे. याप्रकरणी महिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून कर्जत पोलिसांनी जयश्री कोपर्डेकरला अटक केले होते. परंतु, न्यायालयाने तिला जामीन मंजूर केले आहे. त्याचबरोबर या प्रकरणातील सुत्रधार मनीष लोकरस याला सांगली येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


हेही वाचा – कामगार अध्यक्ष सांगत ५४ हजारांची मागितली खंडणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -