Bank Holidays In November: नोव्हेंबर महिन्यात बँकाना १७ दिवस सुट्टी, पहा पूर्ण यादी

Bank Holidays In November: नोव्हेंबर महिन्यात बँकाना १७ दिवस सुट्टी, पहा पूर्ण यादी

Bank Holidays in April 2023

ऑक्टोबर नोव्हेंबर महिना विविध सणांनी भरलेला महिना आहे. नोव्हेंबर महिन्यात दिवाळीची लगबग असते. दिवाळीच्या दिवसात तुमची बँकेच्या व्यवहारासंदर्भात काही महत्त्वाची कामे असतील तर लवकरात लवकर पूर्ण करा कारण नोव्हेंबर महिन्यात देशातील बँका तब्बल १७ दिवस बंद राहणार आहेत. देशातील विविध ठिकाणच्या बँकांचे १७ दिवस कामकाज बंद राहणार आहे. नोव्हेंबर महिन्यात दिवाळी सर्वांत मोठा सण आहे. त्यामुळे दिवाळीनिमित्त बँका बंद राहणार आहेत. त्याचप्रमाणे दिवळीचे दिवस वगळता नोव्हेंबर महिन्यातील इतर दिवशीही बँका बंद राहणार आहेत.  नोव्हेंबर महिन्यात बँकांच्या सुट्ट्यांचे वेळापत्रक जाणून घ्या.

नोव्हेंबर महिन्यात दिवाळी छट पूजा यासारखे महत्त्वाचे सण येत आहेत. त्याचप्रमाणे काही विशेष व्यक्तींच्या जयंतीनिमित्ताने देखील देशातील विविध राज्यात एकूण ११ दिवस बँका बंद राहणार आहेत. ज्यात  ७ नोव्हेंबर,१४,२१ आणि २८ नोव्हेंबर या दिवशी रविवार असल्याने बँका बंद राहणार आहेत. तर १३ आणि २७ नोव्हेंबर रोजी महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकाना सुट्टी असणार आहे. हे दिवस पकडून देशातील विविध राज्यातील बँकाना १७ दिवस सुट्ट्या असणार आहेत.

नोव्हेंबर महिन्यात बँकांच्या सुट्ट्यांचे वेळापत्रक

१ नोव्हेंबर: कन्नड राज्योत्सव/ कुट . हा उत्सव देशातील केवळ बंगळूरू आणि इम्फालमध्ये साजरा केला जातो.

३ नोव्हेंबर: नरक चतुर्दशी

४ नोव्हेंबर: दिपावली अमावस्या (लक्ष्मी पूजन)

५ नोव्हेंबर: बलि प्रतिपदा / विक्रम संवत नव वर्ष / निंगोल चक्कोउबा

६ नोव्हेंबर: भाऊबिज/ चित्रगुप्त जयंती

७ नोव्हेंबर: रविवार

१० नोव्हेंबर: छठ पूजा / डाला छठ ( बिहार झारखंड मधील बँकांना सुट्टी )

११ नोव्हेंबर: छठ पूजा ( बिहार)

१२ नोव्हेंबर: वंगला फेस्टिव्हल ( शिलॉंग राज्यातील बँकांना सुट्टी )

१३ नोव्हेंबर: महिन्याचा दुसरा शनिवार

१४ नोव्हेंबर: रविवार

१९ नोव्हेंबर: गुरू नानक जयंती / कार्तिक पौर्णिमा

२१ नोव्हेंबर: रविवार

२२ नोव्हेंबर: कनकदास जयंती ( बंगळूरू राज्यातील बँकांना सुट्टी )

२३ नोव्हेंबर: सेंग कुत्सनेम (शिलाँग राज्यातील बँकाना सुट्टी )

२७ नोव्हेंबर: महिन्याचा चौथा शनिवार

२८ नोव्हेंबर: रविवार


हेही वाचा – IAC Vikrant: देशातील पहिले स्वदेशी विमानवाहक जहाज ‘विक्रांत’चे दुसरे समुद्र परीक्षण सुरू

First Published on: October 26, 2021 4:37 PM
Exit mobile version