भारतीय वंशाचे बॅनर्जी, डफलो,क्रेमर यांना अर्थशास्त्राचे नोबेल

भारतीय वंशाचे बॅनर्जी, डफलो,क्रेमर यांना अर्थशास्त्राचे नोबेल

यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार भारतीय वंशाचे अमेरिकन नागरीक अभिजीत बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नी एस्थर डफलो यांना जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर मायकल क्रेमर यांनाही हा पुरस्कार विभागून देण्यात येणार आहे. भारतातल्या विकलांगांना चांगलं शिक्षण कसे देता येईल, याबद्दल बॅनर्जी यांनी संशोधन केले. त्याचा फायदा तब्बल ५० लाख मुलांना झाला. या संशोधन कार्यासाठी त्यांना नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

अभिजीत बॅनर्जी हे बहुचर्चित जेएनयुचे विद्यार्थी आहेत. त्यांनी कोलकाता विद्यापीठातून विज्ञान शाखेची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी १९८३ साली जेएनयूमधून एमएपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी परदेशात गेले. १९८८ साली त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून पीएचडी केली.

या तिन्ही शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनामुळे गरिबीचे उच्चाटन करण्यात मदत मिळत आहे. गेल्या दोन दशकांमध्ये त्यांच्या प्रयोगावर आधारित प्रयत्नांतून गरिबीचे नष्ट करण्यास मदत आहे, असे नोबेल पुरस्कार समितीने म्हटले आहे.

First Published on: October 15, 2019 6:27 AM
Exit mobile version