बोर तोडताना छातीतून काठी गेली आरपार!

बोर तोडताना छातीतून काठी गेली आरपार!

छातीत घुसली काठी

बोर खाणं एका ८ वर्षाच्या मुलाला महागात पडलं आहे. बोर खाण्यासाठी झाडावर चढला असता हा मुलगा झाडावरुन खाली पडला. त्यावेळी त्याच्या छातीतून काठी घुसून ती पाठीतून बाहेर आली. मध्य प्रदेशच्या बडवाणीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. ८ वर्षाचा सुरेश आपल्या लहान बहिणीला खूश करण्यासाठी बोराच्या झाडावर चढला होता. तो बोर काढण्याचा प्रयत्न करत असतानाच फांदी तुटून सुरेश खाली पडला आणि ती लाकडाची फांदी त्याच्या छातीतून आरपार पाठीतून निघाली.

अशी घडली घटना

बोर काढण्याच्या नादात जे घडले ते भयानक होते. असे असताना सुरेश त्या झाडापासून जवळपास ५०० मीटर घरापर्यंत चालत आला. रक्ताने माकलेल्या सुरेशला पाहून त्याच्या कुटुंबियांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. त्यांनी ताबडतोब सुरेशला पाटी समुदायाच्या आरोग्य केंद्रात दाखल केले. त्याला तिथून थेट जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. शरीरात काठी घुसल्याने सुरेशचा रक्तस्त्राव खूप झाला. त्यामुळे त्याल रक्त चढवण्यात आली. त्याची प्रकृती नाजूक असताना देखील तो कुटुबियांशी बोलत होता. त्याठिकाणी ही उपचार न झाल्यामुळे त्याला इंदौरला हलवण्यात आले.

ऑपरेशन करुन काढणार काठी

‘ऑपरेशन करुन सुरेशच्या छातीतून ती काठी बाहेर काढण्यात येणार’ असल्याचे डॉक्टरांनी सांगिलतले. काठी शरीरात घुसल्यामुळे त्याच्या शरीराच्या आत खूप जखमा झाल्या आहेत. सुरेशच्या वडिलांनी सांगितले की, ‘त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे. माझ्या मुलाच्या हिंमतीमुळे माझ्या मुलाचा जीव वाचला आहे. सुरेश जर शाळेत गेला असता तर ही घटना घडली नसती’, असं त्यांनी सांगितले आहे.

First Published on: January 11, 2019 8:18 PM
Exit mobile version