धनत्रयोदशीला हिरे खरेदी करताय? सावधान!

धनत्रयोदशीला हिरे खरेदी करताय? सावधान!

धनत्रयोदशीला हिरे खरेदी करताय? सावधान!

धनत्रयोदशीला दागिणे खरेदी करण्याची प्रथा आहे. ग्राहकांनी आता सोन्याला पर्याय म्हणून हिरे खरेदी करण्यास महत्व दिले आहे. परंतु, ही बातमी महत्वाची आहे. हिरे खरेदी करताना सावधानी बाळगणे महत्त्वाचे आहे. कारण भारतातील ४० टक्के हिरे अप्रमाणित असल्याचे इंटरनॅशनल जेमॅकोलॉजिकल इन्स्टिट्यूटच्या (आयजीआय) माहितीत समोर आले आहे. आयजीआय ही हिऱ्यांचे प्रमाणीकरण करणारी जगातील सर्वात मोठी संस्था आहे. ही संस्था हिऱ्यांच्या प्रत्येक पैलूची तपासणी करुन त्यांचे ग्रेडींग करते. या संस्थेचे जगभरात २३ प्रयोगशाळा आहेत. यामधील १५ प्रयोगशाळा भारतात आहेत. यातील बांद्रा येथे हिऱ्यांची प्रमुख प्रयोगशाळा आहे. तिथे तंत्रज्ञानाद्वारे हिऱ्यांची तपासणी केली जाते.

भारतातून ८० टक्के हिरे निर्यात होतात

लोकमत वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार भारतात पैलू पाडल्या जाणाऱ्या हिऱ्यांना जगभरात मागणी आहे. त्यामुळे जगाला लागणाऱ्या ८० टक्के हिऱ्यांची निर्यात भारतात होते. आयजीआयच्या १५ प्रयोगशाळांमध्ये रोज ४ लाख हिऱ्यांचे प्रमाणिकरण होते. त्याचबरोबर महिन्याभरात २ लाख हिऱ्यांच्या दागिण्यांचे प्रमाणिकरण होते. भारतीय बाजारात हळूहळू हिरे हे सोन्याला पर्याय ठरत आहेत. त्यामुळे हिऱ्यांचे प्रमाणीकरण करण्याचे प्रमाण २५ टक्यांनी वाढले आहे.

जगात वापरले जाणारे १० पैकी ८ हिरे भारताचे

जगात वापरल्या जाणाऱ्या १० पैकी ८ हिरे हे भारताचे असल्याची माहिती आयजीआयचे महाव्यवस्थापक रमित कपूर यांनी दिली. भारतातील हिऱ्यांचे बाजार जगभरातील बाजाराच्या तुलनेत कमी आहे. पण जगात वापरल्या जाणाऱ्या १० पैकी ८ हिऱ्यांवर भारतात पैलू पाडले जातात. यामुळे हिरे निर्यातीत भारताचा प्रथम क्रमांक आहे. याअगोदर बेल्जियम अग्रस्थानी होते. परंतु, हिऱ्यांना पैलू पाडण्याचे काम भारतातील कारागिरांव्यतीरिक्त कुणीही करु शकत नाही, त्यामुळे भारतात निर्माण होणाऱ्या हिऱ्यांना जगभरात मागणी असल्याचे ते म्हणाले.


हेही वाचा – हिरे व्यापाऱ्याने दिला कर्मचाऱ्यांना ६०० कारचा दिवाळी बोनस

First Published on: November 5, 2018 12:48 PM
Exit mobile version