घरदेश-विदेशहिरे व्यापाऱ्याने दिला कर्मचाऱ्यांना ६०० कारचा दिवाळी बोनस

हिरे व्यापाऱ्याने दिला कर्मचाऱ्यांना ६०० कारचा दिवाळी बोनस

Subscribe

सुरतमधील प्रसिद्ध हिरे व्यापारी सावजी ढोलकीया आपल्या कर्मचाऱ्यांने दिवाळीचा बोनस देण्यासाठी कर्मचाऱ्यांना तब्बल ६०० गाड्या भेट म्हणून दिल्या आहेत.

दिवाळी हा सण संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे या सणात कर्मचाऱ्यांची दिवाळी देखील जोरात असते. दिवाळी सण आला की उत्सकता लागते की दिवाळी बोनसची. कंपनीतील कर्मचाऱ्यांना बोनस आणि भेटवस्तू दिल्या जातात. मात्र सूरतमध्ये प्रसिद्ध हिरा व्यापारी सावजी ढोलकीयाने यंदा दिवाळी भेट म्हणून चक्क कर्मचाऱ्यांना कार आणि एफडी गिफ्ट दिले आहेत. तर या गाड्यांच्या चाव्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देण्यात येणार आहेत.

तीन कर्मचाऱ्यांना दिली मर्सिडीज बेन्झ

सुरतमधील प्रसिद्ध हिरे व्यापारी सावजी ढोलकीया आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस देण्यासाठी नेहमीच चर्चेत असतात. यंदाही त्यांनी दिवाळी भेट म्हणून आपल्या कर्मचाऱ्यांना ६०० कार गिफ्ट दिल्या आहेत. तर ९०० कर्मचाऱ्यांना बँकेत एफडी भेट दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या भेटीवर सावजी ढोलकीया या हिरे व्यापाऱ्यांनी चक्क ५० कोटी रुपयांचा खर्च केला आहे. तर दोन महिन्यांपूर्वी या कंपनीत २५ वर्ष काम करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना मर्सिडीज बेन्झ भेट म्हणून दिली आहे. महेश चंद्रपारा (४३), निलेश जाडा (४०) आणि मुकेश चंद्रपारा (३८) यांना हे सर्वात मोठे गिफ्ट दिले आहे.

- Advertisement -

२०१४, २०१६ मध्ये ही दिली दिवळी भेट

प्रसिद्ध हिरे व्यापारी सावजी ढोलकीया यांनी २०१४ साली १३०० कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून गाड्या, सदनिका आणि दागिने दिले होते. तर २०१६ साली आपल्या १ हजार ७६१ कर्माचाऱ्यांना गाड्या, सदनिका आणि दागिने भेट म्हणून दिले असून त्यांना खूश केले आहे.

हे आहेत सावजी ढोलकिया

‘हरे कृष्ण एक्सपोर्ट लिमिटेड’ या कंपनीचे सावजी संस्थापक आहेत. त्यांच्या कंपनीतून जवळपास ५० देशांमध्ये हिऱ्यांची निर्यात केली जाते. हिरा व्यापाऱ्यांमध्ये सावजी ढोलकिया हे ‘सावजी काका’ या नावाने प्रसिद्ध आहेत. गुजरातच्या दुधारा गावातल्या शेतकरी कुटुंबात सावाजींचा जन्म झाला. वयाच्या १३ व्या वर्षात शाळा सोडल्यानंतर त्यांनी आपल्या काकाला हिरा व्यवसायात मदत करायला सुरुवात केली आहे.

- Advertisement -

वाचा – एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार दिवाळी बोनस

वाचा – दिवाळी निमित्ताने सरकारकडून बोनस : साखरेचा भाव कमी होणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -