ऐकावं ते नवलच! हा अब्जाधीश वयाच्या ८९ वर्षी झाला ‘बाबा’

ऐकावं ते नवलच! हा अब्जाधीश वयाच्या ८९ वर्षी झाला ‘बाबा’

आई – वडिल होण्याचे कोणतेही ठराविक वय नसते. अगदी नव्वदी जवळ आलेला मनुष्यदेखील बाबा बनू शकतो. असेच एक अजब उदाहरण समोर आले आहे. स्वित्झर्लंड येथील अब्जाधीश असलेल्या बर्नी एक्सेस्टोन यांना वयाच्या ८९ व्या वर्षी मुलगा झाला आहे. तर त्यांची पत्नी ही त्यांच्यापेक्षा ४५ वर्षांनी लहान आहे. या संबंधीत जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, फॉर्म्युला वन कार रेसिंगचे माजी अध्यक्ष असलेल्या बर्नी एक्लेस्टोन आणि त्यांची पत्नी फॅबियाना फ्लॉसी हिने बुधवारी एका मुलाला जन्म दिला आहे. त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव एस ठेवले आहे. फॅबियाना आणि बर्नी यांचे २०१२ साली लग्न झाले होते. हे त्यांचे तिसरे लग्न असून त्यांना यापूर्वीच्या विवाहातून तीन मुली आणि पाच नातवंडे आहेत.

बर्नी यांचे पहिले लग्न इवी बॅमफोर्ड यांच्याशी झाले होते. त्यांना या विवाहापासून डेबोरा नावाची मुलगी आहे. डेबोरा या ६५ वर्षांच्या असून त्यांनी स्लाविका रॅडिक हिच्याशी दुसरा विवाह केला होता. या दोघांना ३५ वर्षीय तमारा आणि ३१ वर्षीय पेट्रा अशा दोन मुली आहेत. २००९ मध्ये फॅबियाना हिच्याशी ओळख झाल्यानंतर बर्नी यांनी स्लाविका यांना घटस्फोट दिला होता. येत्या ऑक्टोबर महिन्यात बर्नी आपला ९० वा वाढदिवस साजरा करत आहेत.

हेही वाचा –

PUBG च्या नादात पोराने वडिलांच्या खात्यातून उडवले १६ लाख रुपये!

First Published on: July 4, 2020 11:03 PM
Exit mobile version