Polio vaccine तयार करणारी कंपनी उत्तर प्रदेशात COVAXIN चं उत्पादन करणार

Polio vaccine तयार करणारी कंपनी उत्तर प्रदेशात COVAXIN चं उत्पादन करणार

DCGI ने भारत बायोटेक लसींची एक्सपायरी डेट १२ महिन्यांपर्यंत वाढवली, स्टॉक होणार रि-लेबल

देशात कोरोनाचा कहर सुरू असून या लढ्यात महत्वाची भूमिका बजावलेल्या Covaxin या लसीची निर्मिती आता उत्तर प्रदेशमध्येही होणार असल्याचे सांगितले जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुलंदशहरच्या चोला औद्योगिक क्षेत्रात स्थित असलेल्या बिबकोल कंपनीला या लसीच्या उत्पादनास मान्यता दिली आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ३० कोटींच्या अर्थसंकल्पांनाही मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे देशात काही प्रमाणात लसींची कमतरता दूर होईल, अशी अपेक्षा आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून देशभऱात लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. मात्र अनेक राज्यांत लसींचा तुटवडा भासत असल्याची तक्रारही आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Covaxin लस तयार करणार्‍या भारत बायोटेकने बिबकोल कंपनीबरोबर करार केला असून उत्तरप्रदेशात येत्या ऑगस्टपासून उत्पादन सुरू होणार असून दरमहा २ कोटी लसींचे डोस तयार केले जाणार आहेत. तर उत्तर प्रदेशात तयार होणारे हे डोस देशातील इतर राज्यांतही वितरित केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

यापूर्वी बिबकोल या कंपनीत केवळ पोलिओ लसींचे उत्पादन करण्यात येत होते. कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार, सध्याची पायाभूत सुविधा लस उत्पादनासाठी पुरेशी आहे. या कंपनीत दरवर्षी २५ कोटी पोलिओ लस तयार केल्या जात असून त्याची क्षमता ६० कोटी इतकी आहे. दरम्यान, देशात लसींचा तुटवडा भासत असल्याने महाराष्ट्रात १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांचे लसीकरण बंद केले आहे. उत्तर प्रदेश, ओडिशा, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा यांनी या लस घेण्यासाठी जागतिक स्तरावर निविदा काढल्या आहेत. तर वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावादरम्यान, छत्तीसगड आणि हरियाणा सरकारने केंद्रांना पुरवठा वेगवान करण्यास सांगितले आहे.


First Published on: May 13, 2021 2:42 PM
Exit mobile version