घरदेश-विदेशCovid-19 Vaccine: २ ते १८ वयोगटातील मुलांवर होणार Covaxin लसींचे ट्रायल; DCGI...

Covid-19 Vaccine: २ ते १८ वयोगटातील मुलांवर होणार Covaxin लसींचे ट्रायल; DCGI ची परवानगी

Subscribe

५२५ निरोगी स्वयंसेवकांवर होणार COVAXIN लसीची चाचणी

देशात कोरोना व्हायरसचा उद्रेक सुरू असून गेल्या २४ तासांत ३ लाख ६२ हजार ७२७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४ हजार १२० जणांच्या बळी गेला आहे. अशा परिस्थितीत भारतासाठी एक चांगली बातमी मिळाली आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने Drugs Controller General of India (DCGI) गुरुवारी २ ते १८ वयोगटातील COVAXIN च्या दुसऱ्या आणि तिसर्‍या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यांना मान्यता दिली. दरम्यान, ५२५ निरोगी स्वयंसेवकांवर COVAXIN लसीची चाचणी घेण्यात येणार असल्याचे भारत बायोटेककडून सांगितले जात आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान, लहान मुलांना कोरोनाची लागण होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे देशात लहान मुलांना कोरोनाची लस कधी देण्यात येणार याच्या प्रतिक्षेत सर्व जण आहेत. या पार्श्वभूमीवर २ ते १८ वयोगटातील मुलांवर चाचणीसाठी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीची शिफारस नुकतीच तज्ज्ञांकडून करण्यात आली होती. ही शिफारस बुधवारी मान्य करण्यात आली आहे. कोरोनाच्या उद्रेकादरम्यान, २ ते १८ वयोगटातील लसीकरणाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय मानला गेला. सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने (SEC) भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला २ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांच्या फेज २ आणि ३ मानवी क्लिनिकल चाचण्यांसाठी परवानगी दिली असल्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

सध्या हैदराबादमधील भारत बायोटेक कंपनीची कोवॅक्सिन लस कोरोना विरोधातील लढाईत प्रभावी ठरत आहे. कंपनीकडून ही लस ८१ टक्के प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर भारत बायोटेकची लस प्रभावी असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. त्यामुळे २ ते १८ वयोगटातील लसीकरणाच्या अनुषंगाने दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांसाठी कोवॅक्सिन लसीचा वापर करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -