आत्महत्येचे प्लॅनिंग आधीपासूनच?

आत्महत्येचे प्लॅनिंग आधीपासूनच?

बुराडीतील भाटिया कुटुंब

दिल्लीतील बुराडी परीसरात भाटिया कुटुंबातील ११ जणांचे मृतदेह सापडले आणि एकच खळबळ माजली. गळ्याला फास लावलेले, डोळे आणि तोंड कपड्याने बांधलेले मृतदेह पाहून अनेकांच्या पायाखालची जमीनच सरकली. एकाचवेळी कुटुंबातील ११ जण आत्महत्या का करतील असा प्रश्न कुटुंबियांनी केला आणि मग ही हत्या का? या दृष्टीकोनातून तपास सुरु झाला. पण आता यात आणखी एक नवा खुलासा समोर आला आहे. आत्महत्येच्या आदल्याच दिवशीचे काही सीसीटीव्ही फुटेज हाती आले आहेत. त्यामुळे या आत्महत्येचे प्लानिंग आधीच ठरले होते असे काहीसे दिसत आहे.

सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती

बुराडीच्या संत नगर परीसरात राहणाऱ्या भाटिया कुटुंबाच्या मृत्युचे गूढ कायम असताना आता या घटनेवर प्रकाश टाकणारे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती आले आहेत. आत्महत्येच्या ठिकाणी सापडलेले स्टुल येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांच्या घरातील मुली घेऊन जाताना दिसत आहेत. तर सकाळी ललित मंदिरात जाताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांची ही तयारी आधीपासूनच सुरु होती हे दिसत आहे.

घरात रहस्यमयी गोष्टी

भाटिया कुटुंबातील घरात सगळ्याच गोष्टी अगदी रहस्यमयी आहेत. घरातील भिंतीला असलेले ११ पाईप त्यांची दिशा, ११ खिडक्या आणि ११ पायऱ्या सगळेच अगदी चक्रावून सोडणारे आहेत. या सगळ्या गोष्टी घरात हवा खेळती रहावी म्हणून करण्यात आल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.यात अंधश्रद्धेचा काही संबंध नसल्याचे देखील त्यांनी सांगितले होते. तरीदेखील या सगळ्या मागचा शोध पोलीस घेत आहेत.

भाटिया यांच्या घराच्या भिंतीवरील पाईपचा नेमका अर्थ कळालेला नाही (सौजन्य- डेक्कन क्रोनिकल्स)

डायरीत सापडले मोक्षाचे उपाय

घरातील मुलगा ललित भाटिया यांनी एका डायरीत मोक्ष मिळण्यासाठीचे उपाय लिहून ठेवले होते. २००७ साली त्यांनी याची नोंद केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा २०१८मध्ये या संदर्भातल्या नोंदी पोलिसांना सापडल्या आहेत. हे अक्षर ललित भाटिया यांचे असल्याचे देखील पोलिसांनी सांगितले आहे. त्यात लिहिलेल्या नुसारच त्याचे मृतदेह आढळले होते. शिवाय घरातील मोठा मुलगा त्याचे मृत वडील ललित यांच्या संपर्कात होता. त्यांच्याशी तो बोलायचा आणि त्यांनीच हे उपाय त्याला सांगितल्याचे म्हटले जात आहे.

पोस्टमार्टम रिपोर्ट नुसार ही आत्महत्याच

भाटिया कुटुंबातील ११ जणांनी आत्महत्या केल्याचे पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आले आहे. पण त्यांचे नातेवाईक हे कारण ऐकायला तयार नाहीत.११ जणांची मानसिकता एक कशी असू शकेल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. पण ही आत्महत्या असल्याचे मात्र पोस्टमार्टम रिपोर्ट सांगत आहे. तरीही या घटनेचा अद्यापही उलगडा झाला नाही.

वाचा- दिल्लीत एकाच घरामध्ये सापडले ११ मृतदेह!

वाचा- मोक्ष मिळवण्यासाठी आत्महत्या?

First Published on: July 4, 2018 6:17 PM
Exit mobile version