देश तोडणाऱ्यांच्या समर्थनार्थ भारत जोडो यात्रा; स्वरा भास्करच्या सहभागावर भाजपाची टीका

देश तोडणाऱ्यांच्या समर्थनार्थ भारत जोडो यात्रा; स्वरा भास्करच्या सहभागावर भाजपाची टीका

कॉंगेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत आज बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सहभागी झाली होती. तिच्या या सहभागानंतर भाजपाने कॉंग्रेसवर टीका केली आहे. देश तोडणाऱ्यांच्या समर्थनार्थ भारत जोडो यात्रा काढण्यात येत आहे, अशा शब्दांत भाजपने टीका आहे. (bhopal bharat jodo yatra being taken out in support of those who break the country bjp said on the participation of swara bhaskar)

अभिनेत्री स्वरा भास्करच्या भारत जोडो यात्रेतील सहभागावर मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले की, “राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत तुकडे तुकडे टोळीचे समर्थक स्वरा भास्कर आणि कन्हैया कुमार यांसारख्या देशविरोधी मानसिकतेच्या लोकांचा सहभाग म्हणजे भारत तोडणाऱ्यांच्या समर्थनार्थ ही यात्रा काढण्यात येत असल्याचा हा पुरावा आहे”

कॉग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रेला’ गुरुवारी सकाळी मध्य प्रदेशातील उज्जैन येथून घाटिया, घोसलाकडे सुरुवात झाली. या यात्रेत आज बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सहभागी झाली होती. तसेच, माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, काँग्रेस नेते हरीश रावत, आमदार रामलाल मालवीय, मुरली मोरवाल आणि हजारोंच्या संख्येने नागरिक या यात्रेमध्ये सहभागी झाले होते.

या भारत जोडो यात्रेनिमित्त राहुल गांधी आणि स्वरा भास्कर यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने नागरिक रस्त्याच्या कडेला उभे होते. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर कॉग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. “लोकशाहीच्या रक्षणासाठी आम्ही जो संकल्प करून बाहेर पडलो आहोत, हा त्याचा पुरावा आहे. भारत जोडो यात्रेला प्रत्येक वर्गाचा आणि पिढीचा पाठिंबा मिळत असून, या यात्रेला संविधान आणि देशाच्या एकात्मतेच्या रक्षणाचा पाया आहे.

मध्य प्रदेशच्या उज्जैन येथील आरडी गार्डी मेडिकल कॉलेज येथून सकाळी 6 वाजता यात्रा सुरू झाली. ही यात्रा सकाळी 10 वाजता नजरपूर गावातील एचपी पेट्रोल पंपाजवळ विश्रांतीसाठी थांबली. त्यानंतर दुपारी पुन्हा घाटिया बसस्थानकापासून सुरू झाली असून झालर गावात पोहोचल्यानंतर प्रवासी विश्रांतीसाठी थांबणार आहे.


हेही वाचा – असे प्रकार इतर देशातही होतात, पण भारतात…, छेडछाड झालेल्या कोरिअन मुलीची प्रतिक्रिया

First Published on: December 1, 2022 4:43 PM
Exit mobile version