गुजरातचे 18 वे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल आज घेणार शपथ; पंतप्रधान मोदींसह अनेक नेते राहणार उपस्थित

गुजरातचे 18 वे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल आज घेणार शपथ; पंतप्रधान मोदींसह अनेक नेते राहणार उपस्थित

भारतीय जनता पक्षाचे नेते भूपेंद्र पटेल हे आज ( 12 डिसेंबर) गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. आज दुपारी 2 वाजता गुजरातच्या गांधीनगरमधील नवीन सचिवालयाजवळील हेलिपॅड मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, . गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्यासह भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून पटले यांची ही दुसरी टर्म असून ते आता राज्याचे 18 वे मुख्यमंत्री असतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. यांच्यासह 5 राज्यांचे माजी मुख्यमंत्री नितीन गडकरी, मनसुख मांडविया, पुरुषोत्तम रुपाला आणि 7 हून अधिक केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या संसदीय मंडळाच्या सदस्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.  पटेल यांच्यासह काही नवीन मंत्र्यांचाही शपथी पार पडण्याची शक्यता आहे.

नुकत्याच पार पडलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने 182 पैकी विक्रमी 156 जागा जिंकल्या. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपचा हा सलग सातवा विजय आहे. यात काँग्रेसने 17 तर ‘आप’ने पाच जागा जिंकल्या आहेत.

भूपेंद्र पटेल (६०) यांनी शुक्रवारी आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह राज्यात नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा करण्यासाठी राजीनामा दिला होता. शनिवारी त्यांची भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली. त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन पुढील सरकार स्थापनेचा दावा केला. घाटलोडिया जागेवर पटेल यांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्याचा 1.92 लाख मतांनी पराभव केला. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये विजय रुपानी यांच्या राजीनाम्यानंतर पटेल यांच्याकडे राज्याची कमान आली होती.

दरम्यान, मंत्रिपदाचे उमेदवार निवडण्यासाठी भाजपमध्ये जोरदार चर्चा सुरू असल्याचे म्हटले जातेय. जाती आणि प्रादेशिक प्रतिनिधित्वाचा समतोल साधण्याच्या कसोटीवर पक्षाला चालावे लागेल. यामुळे आमदार कनू देसाई, राघवजी पटेल, हृषिकेश पटेल, हर्ष संघवी, शंकर चौधरी, पूर्णेश मोदी, मनीषा वकील आणि रमण पाटकर हे नेते मंत्रिमंडळात सामील होण्याची शक्यता आहे.


सर्वसामान्यांच्या सरकारने ‘आम आदमी’कडे लक्ष द्यावे!

First Published on: December 12, 2022 8:04 AM
Exit mobile version