छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री भूपेश बघेल

छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री भूपेश बघेल

असीम दास याने 'बघेल' यांच्या नावाने राजकारण्यांना मोठी रक्कम देण्याची व्यवस्था केल्याचे उघड झाले आहे

अखेर छत्तीसगड राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्याचे नाव जाहीर झाले असून काँग्रेसचे छत्तीसगड प्रदेशाध्यक्ष भूपेश बघेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. टी. एस. सिंग देव यांच्याकडून बघेल यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. काँग्रेसच्या आमदारांची बैठक आज, रविवारी रायपूर येथील कार्यालयात पार पडली. त्यामध्ये या नावाची घोषणा करण्यात आली. बघेल यांची काँग्रेसच्या नवनिर्वाचीत आमदारांचे नेता म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आहे. बघेस हे सोमवार, १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. राज्यात काँग्रेस पक्षाने १५ वर्षानंतर सत्ता स्थापन केली आहे. विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचा बहुमताने विजय झाला आहे. येथील ९० जागांपैकू ६८ जागांवर काँग्रेसचे आमदार बनले आहेत.

 हे वाचा –

Chhattisgarh Elections 2018 : काँग्रेसकडे बहुमत, भाजपचा दारूण पराभव

छत्तीसगडचे मुख्यमंत्री कोण; आज होणार खुलासा

छत्तीसगडमध्ये तिसऱ्या मुख्यमंत्र्याचा चेहरा दिसणार

First Published on: December 16, 2018 2:23 PM
Exit mobile version