घरदेश-विदेशChhattisgarh Elections 2018 : काँग्रेसकडे बहुमत, भाजपचा दारूण पराभव

Chhattisgarh Elections 2018 : काँग्रेसकडे बहुमत, भाजपचा दारूण पराभव

Subscribe

छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या ९० जागांमध्ये दोन टप्प्यांमध्ये पार पडलेल्या मतदानानंतर मंगळवार, ११ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या मतमोजणीतून काँग्रेस आघाडीवर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकीचे अंतिम निकाल हाती आले असून यामध्ये काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. तर भाजपचा दारूण पराभव झाला आहे.

छत्तीसगड निकाल २०१८

एकूण – ९० जागा
बहुमताचा आकडा – ४६

काँग्रेस – ६८
भाजप – १५
जनता काँग्रेस छत्तीसगड – ५
बहुजन समाज पार्टी – २


छत्तीसगडमध्ये काँग्रेस ३९ जागांवर विजयी झाले आहे तर भाजप ८ जागांवर, बसपा एका जागेवर आणि जनता काँग्रेस छत्तीसगड २ जागांवर विजयी झाले आहे.

- Advertisement -

छत्तीसगडमध्ये काँग्रेस ३५ जागांवर विजयी झाले आहे तर भाजप ७ जागांवर आणि बसपा एका जागेवर विजयी झाले आहे.


छत्तीसगडमध्ये काँग्रेस २८ जागांवर विजयी झाले आहे तर भाजप ६ जागांवर आणि बसपा एका जागेवर विजयी झाले आहे.

- Advertisement -

छत्तीसगडमध्ये काँग्रेस २६ जागांवर विजयी झाले आहे तर भाजप ४ जागांवर आणि बसपा एका जागेवर विजयी झाले आहे.


रायपूर – छत्तीसगड विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या काँग्रेच्या उमेदवाराच्या वजना ऐवढे लाडू वाटून जल्लोष साजरा करण्यात आला.


छत्तीसगडमध्ये काँग्रेस २२ जागांवर विजयी झाले आहे तर भाजप ३ जागांवर विजयी झाले आहे.


छत्तीसगडमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. काँग्रेस ६६ तर भाजप १६ जागांवर आघाडीवर आहे.


छत्तीसगडचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भुपेश बघेल विजयी झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळ करत जल्लोष साजरा केला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत भूपेश बघेल यांनी जल्लोष साजरा केला.


छत्तीसगडच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भुपेश बघेल यांनी रायपूर येथील काँग्रेसच्या कार्यालयात उपस्थिती लावली असून ही लढाई नागरीकांनी स्वतःच्या हातात घेतली होती, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच आम्ही ही लढाई छत्तीसगडच्या नागरीकांसाठी लढली असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे या विजयासाठी आभार मानतो. आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त जागांवर यश मिळाले आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार असल्याचेही बघेल यांनी स्पष्ट केले.


छत्तीसगडमध्ये बहुजन समाज पक्ष (बसप) ने खातं उघडलं. त्यांचा एक उमेदवार आघाडीवर आहे. तर काँग्रेस त्यांच बहुमत कायम राखत ६१ तर भाजप १५ जागांवर आघाडी राखून आहेत.


छत्तीसगडमध्ये दुपारी १ वाजेपर्यंतच्या मतमोजणीची आकडेवारी पाहिल्यास काँग्रेस ५९ जागांवर आघाडी कायम राखून आहे. तर भाजपने १७ जागांवर आघाडी घेतली आहे. दुसरीकडे कम्युनिस्ट पार्टी आणि गोंडवाना गणतंत्र पार्टी प्रत्येकी एक-एक उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. जनता काँग्रेस छत्तीसगड या पक्षाचे ५ उमेदवार आघाडीवर आहे. त्यामुळे काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला असून लवकरच विजयाचा झेंडा छत्तीसगडमध्ये फडकवण्यासाठी ते सज्ज झाले आहेत.


छत्तीसगडमध्ये सर्व निकाल हाती आले असून मुख्यमंत्री रमन सिंग यांची १५ वर्षानंतर सत्त संपुष्टात आल्याचे दिसत आहे. काँग्रेस ४० जागांवर, भाजप १५ तर जनता काँग्रेस ५ जागांवर आघाडीवर आहेत.


छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या ९० जागांसाठी मतमोजणी सुरु असून सर्वात आधी मतपत्रांची मोजणी होत असून त्यानंतर ईव्हीएम मशीन्सद्वारे झालेल्या मतदानाचे निकाल समोर येतील. यंदा राज्यात त्रिशंकू लढत पाहायला मिळत असून भाजप, काँग्रेससोबत अजीत जोगी यांच्या पक्षामध्ये लढत पाहायला मिळत आहे.


रायपूरच्या धरसीवामध्ये काँग्रेसची उमेदवार प्रत्याशी अनीता योगेंद्र शर्मा यांच्या प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार देवजी भाई पटेल यांना तब्बल २००० मतांनी मागे टाकत आघाडी घेतली आहे.


बिलासपूरच्या मरवाहीमधून अजीत जोगी हे १८९० मतांनी आघाडीवर आहेत.


कांकेरच्या अंतागड विधानसभा क्षेत्रातून भाजपचे विक्रम उसेंडी केवळ २ मतांनी आघाडीवर आहेत.


वाचा : Madhya Pradesh Elections 2018 : बसपा किंगमेकर? ७ जागी आघाडीवर

वाचा : Rajasthan Election 2018 : भाजप ७९, काँग्रेस १००

वाचा : Telangana Elections 2018 : तेलंगणात टीआरएस सत्ता बसवणार?

वाचा : Mizroam Election 2018: मिझो फ्रंट पुन्हा आघाडीवर


छत्तीसगड विधानसभा निवडणूक २०१८

एकूण जागा – ९०

बहुमताचा आकडा – ४६

काँग्रेस – ६० 

भाजप – २४ 

इतर – ६ 

आघाडींवर


छत्तीसगडमध्ये काँग्रेसमधून बाहेर पडून अजीत जोगी यांनी छत्तीसगड जनता काँग्रेस या पक्षाची स्थापना केली होती. राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले अजीत जोगी हे मारवाही मतदारसंघातून तिसऱ्या स्थानावर असल्याचे दिसून येत आहे. तर याच मतदारसंघात भाजप पहिल्या तर काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आघाडीवर आहेत.


छत्तीसगडमध्ये काँग्रसेच्या ५४ जागांवर आघाडी. मुख्यमंत्री डॉ. रमन सिंग पिछाडीवर असून काँग्रेसच्या करुण शुक्ला यांनी आघाडी घेतली आहे. हे दोघे रांजनांदगाव या मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत.

छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा बहुमताचा आकडा पार. काँग्रेस ४६, भाजप ३४ आणि इतर ७ जागांवर आघाडीवर असल्याचे पहिल्या तासाभराच्या मतमोजणीनंतर चित्र पाहायला मिळत आहे.


छत्तीसगडमध्ये काँग्रेस बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे. भाजपला मोठ धक्का बसण्याची शक्यता.


छत्तीसगडमध्ये पहिल्या एक तासाभरात आलेल्या मतमोजणीत राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे उमेदवार रमन सिंग पिछाडीवर असल्याचे आकडेवारी सांगत आहेत.


काँग्रेसमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. काँग्रेसमध्ये बाहेर पडून अजीत जोगी यांनी छत्तीसगड जनता काँग्रेस या पक्षाची स्थापना केली होती. तसेच अजी जोगी यांच्या पक्षाने बसपसोबत आघाडी केली आहे.


मुख्यमंत्री रमन सिंह हे चौथ्यांदा मुख्यमंत्री बनतात की, काँग्रेस आपले सरकार स्थापन करते हे आजचा निकाल ठरवणार आहे.


छत्तीसगडमध्ये काँग्रेसची घोडदौड सुरुच. भाजप पिछाडीवर. काँग्रेस ३३ तर भाजप २५ जागांवर आघाडीवर आहे.


काँग्रेस-भाजप-छत्तीसगड जनता काँग्रेसमध्ये तिरंगी लढत. काँग्रेस २५, भाजप २१ आणि इतर ५ जागांवर आघाडीवर आहे.


छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या ९० जागांमध्ये दोन टप्प्यांमध्ये पार पडलेल्या मतदानानंतर मंगळवार, ११ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणीसाठी ५१८४ अधिकारी आणि १५०० मायक्रोऑब्जर्वर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक हॉलमध्ये मतमोजणीसाठी १४ टेबल, रिटर्निंग ऑफिसर मेज आणि डाक मतपत्रांची मोजणी होईल. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मतमोजणी केंद्रांवर त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या ठिकाणी प्रत्येकाला ओळखपत्र दाखवल्यानंतरच प्रवेश दिला जाणार आहे. पहिल्या अर्धा तासांच्या मतमोजणीनंतर काँग्रेसने आघाडी घेतली असून या पक्षाचे २० उमेदवार तर भाजप १८ जागांवर आघाडीवर आहे. तर इतर ४ अशी आकडेवारी समोर येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -