निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; १७ वर्ष पूर्ण झाल्यानंतर करू शकता मतदार नाव नोंदणी

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; १७ वर्ष पूर्ण झाल्यानंतर करू शकता मतदार नाव नोंदणी

मतदार यादीत नाव नोंदणी आता करण्यासाठी १८ वर्ष पूर्ण होण्याची वाट पाहावी लागणार नाही. निवडणूक आयोगाने या संदर्भात नवे निर्देश दिले आहेत. १७ वर्षांवरील युकवकांना मतदार यादीत आगाऊ अर्ज भारत येणार आहे. ही मुभा निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. मतदार यादीत मतदारांचे नाव नोंदणी करण्यासंबंधीच्या काही तांत्रिक बाबी दूर करण्याचे आदेश राज्यातील निवडणूक आयोगांना देण्यात आले आहेत. हे आदेश मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांनी दिले आहेत.

हे ही वाचा – bmc election : ओबीसी आरक्षणासाठी पुन्हा लॉटरी?, महापालिका आयुक्तांकडून आढावा बैठक

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी मतदारांना त्यांच्या वयाची १८ वर्षे पूर्ण होण्याची वाट पाहावी लागणार नाही. जर का युकांचं वय १७ वर्षांपेक्षा अधिक असेल तर ते मतदार यादीत नाव नोंदणी करू शकतात. नव्या मतदारांना १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑटोबरपासून मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी अर्ज भरता येऊ शकेल. त्याच बरोबर प्रत्येक तिमाहीला म्हणजेच तीन महिन्यातून एकदा मतदार यादी ही अपडेट केली जाते. या यादीतील पात्र मतदारांना पुढल्या तिमाहीत त्यांच्या वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावर मतदान करता येऊ शकते.

हे ही वाचा – BMC Election 2022 : प्रभाग आरक्षण सोडतीमध्ये ‘कही खुशी कही गम’, दिग्गज…

त्याचबबरोबर नोंदणी झाल्यानंतर मतदारांना निवडणूक आयोगाचं मतदार ओळखपत्र सुद्धा देण्यात येईल. १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑटोबर २०२३ पर्यंत जे नागरिक वयाची १८ वर्षे पूर्ण करतील त्यांचे नाव मतदान यादीत समाविष्ट केले जाईल. त्याच बरोबर आधार कार्ड संदर्भातही आयोगाने सांगितले आहे, की आधार कार्डचा क्रमांक मतदार यादीशी जोडण्यासाठी नोंदणी फॉर्म मध्ये जोडण्यासंदर्भात मतदार यादीत तरतूद करण्यात आली आहे. सध्या जे मतदार आहेत त्यांच्यासाठी आधार क्रमांक लिंक करता यावा यासाठी फॉर्म क्रमांक ६ ब सुद्धा उपलब्ध आहे.

हे ही वाचा – Election : राज्यात सप्टेंबरच्या अखेरपर्यंत मतदान होणे शक्य नाही, राज्य निवडणूक आयोगाची…

ऑनलाईन अर्ज भारण्यासाठी काय कराल

– मतदार यादीत नाव असलेला प्रत्येक मतदार त्याचा आधार क्रमांक हा फॉर्म क्रमांक ६ ब मध्ये भरून देऊ शकता.

– या अर्जाची छापील मतदारांना देण्यात येईल

– फॉर्म क्रमांक ६ ब हा भारत निवडणूक आयोगाच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल

– अर्ज क्रमांक ६ द्वारे = नमुना अर्ज क्रमांक ६,७ आणि ८ यामध्ये १ ऑगस्ट पासून सुधारणा करण्यात येणार आहे.

– नमुना ६ ब नव्याने तयार करण्यात आला आहे.

– सुधारित अर्जानुसारच मतदारांनी मतदार यादीतील बदल करावेत.

First Published on: July 28, 2022 4:42 PM
Exit mobile version