घरताज्या घडामोडीBMC Election 2022 : प्रभाग आरक्षण सोडतीमध्ये 'कही खुशी कही गम', दिग्गज...

BMC Election 2022 : प्रभाग आरक्षण सोडतीमध्ये ‘कही खुशी कही गम’, दिग्गज नगरसेवकांना फटका

Subscribe

रक्षण सोडतीमध्ये, माजी महापौर किशोरी पेडणेकर, श्रद्धा जाधव, माजी सभागृह नेत्या विशाखा राऊत, काँग्रेसचे जावेद जुनेजा असे काही जणांना आरक्षण सोडतीमध्ये दिलासा मिळाला आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी वांद्रे, रंगशारदा येथे काढण्यात आलेल्या प्रभाग आरक्षण सोडतीमुळे सर्वात जास्त फटका भाजपला बसला आहे. त्यापाठोपाठ शिवसेना, काँग्रेसलाही त्याचा फटका बसला आहे. शिवसेना, भाजप, कॉंग्रेसमधील दिग्गज माजी नगरसेवकांना जबरदस्त धक्का बसला आहे. त्यामुळे त्यांना आता आजूबाजूच्या प्रभागात बस्तान बसविणे, महिला प्रभाग झाल्याने पत्नीला, नातेवाईकांना संधी देणे, आरक्षण बदलल्याने जवळच्या पदाधिकारी, कार्यकर्ता यांना संधी देणे, असे फंडे अजमवायला लागणार आहेत.

या निवडणुकीत प्रभाग आरक्षित झाल्याने, भाजपचे माजी नगरसेवक व गटनेते प्रभाकर शिंदे, माजी नगरसेवक अभिजित सामंत, विनोद मिश्रा, जगदीश ओझा, आकाश पुरोहित, नील सोमय्या, हरीश भडिंग दीपक ठाकूर, हर्ष पटेल, संदीप पटेल, मकरंद नार्वेकर, अतुल शाह, पंकज यादव, शिवकुमार झा, बाळा तावडे यांना या आरक्षण सोडतीचा मोठा फटका बसला आहे.

- Advertisement -

तसेच, काँगेसचे माजी नगरसेवक व पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा, आश्रफ आझमी, आसिफ झकेरिया, वीरेंद्र चौधरी, सुफियान वणू आदींना आरक्षण सोडतीची फटका बसल्याचे समजते.

पालिकेत गेल्या २५ वर्षांपासून सत्तेवर असलेल्या शिवसेनेचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव, सुधार समितीवरील माजी अध्यक्ष सदानंद परब, बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष आशिष चेंबूरकर, शिक्षण समितीचे माजी अध्यक्ष मंगेश सातमकर, माजी नगरसेवक राजूल पटेल, विठ्ठल लोकरे, संजय घाडी, चंद्रशेखर वायंगणकर, राजू पेडणेकर, उपेंद्र सावंत, उमेश माने, परमेश्वर कदम, अमेय घोले, स्वप्नील टेंम्बवलकर आदींना या आरक्षण सोडतीचा मोठा फटका बसला आहे. मनसेचे एकमेव माजी नगरसेवक संजय तुरडे यांचा प्रभाग महिला प्रभाग झाल्याने त्यांना व पक्षालाही त्याचा फटका बसला आहे.

- Advertisement -

माजी महापौरांसह काहींना दिलासा

या आरक्षण सोडतीमध्ये, माजी महापौर किशोरी पेडणेकर, श्रद्धा जाधव, माजी सभागृह नेत्या विशाखा राऊत, काँग्रेसचे जावेद जुनेजा असे काही जणांना आरक्षण सोडतीमध्ये दिलासा मिळाला आहे. तर शिवसेनेच्या माजी सभागृह नेत्या व आता माजी नामनिर्देशित सदस्य असलेल्या तृष्णा विश्वासराव यांचा पराभव करणारे काँग्रेसचे सुफियांन वणू यांचा प्रभाग महिला प्रभाग झाल्याने तृष्णा विश्वासराव यांच्यासाठी पुन्हा एकदा नगरसेवक होण्यासाठी दरवाजे खुले झाले

आरक्षण सोडतीला आमदार, माजी नगरसेवकांची उपस्थिती

रंगशारदा येथे पालिका निवडणुकीसाठी काढण्यात आलेल्या प्रभाग आरक्षण सोडतील शिवसेनेचे आमदार व माजी नगरसेवक रमेश कोरगावकर, सुधार समितीचे माजी अध्यक्ष, सदानंद परब, माजी महापौर दत्ता दळवी, उपेंद्र सावंत, भाजपचे माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट, माजी नगरसेवक कमलेश यादव, समाजवादी पक्षाच्या माजी नगरसेविका रुक्साना सिद्दीकी आदींसह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

एकीकडे निवडणूक आरक्षण जाहीर होत असताना आणि आरक्षण पार पडल्यानंतर रंगशारदा सभागृहात व आवारात माजी नगरसेवक, पदाधिकारी यांची मोबाईलवरून फोनाफोनी सुरू झाली होती. काहींचा चेहरा पडलेला होता तर काहींच्या चेहऱ्यावर आनंद असे वातावरण बघायला मिळाले दिसत होता. थोडक्यात ‘कही खुशी कही गम’ असे वातावरण बघायला मिळाले.


हेही वाचा : नाशिक मनपा निवडणूक : कुठल्या प्रभागात कोणते आरक्षण ?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -