भाजपाकडूनच आचारसंहितेचे उल्लंघन? काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे धाव

भाजपाकडूनच आचारसंहितेचे उल्लंघन? काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे धाव

निवडणूक

निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा करताच आदर्श आचारसंहिता लागू झाली. लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर देशभर निवडणूक प्रचार जोरदार सुरू झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. आचारसंहिता सुरू झाली असली तरी, आचारसंहितेचा भंग केल्याच्या घटना घडत आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहिता व निवडणूक आयोगाचे नियमांचे उल्लंघन केल्याच्या बऱ्याच तक्रारी सध्या निवडणूक आयोगाकडे येत आहे. या तक्रारींचा भडीमार सध्या निवडणूक आयोगाला सहन करावा लागत आहे.

या मुद्द्यांवर काँग्रेसकडून आक्षेप

शुक्रवारी १५ मार्च रोजी कॉग्रेसच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरूद्ध केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली असून, पूर्व केंद्रीय मंत्री आरपीएन सिंह यांनी निवडणूक आयोगाकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात तक्रार केली. आचारसंहितेला काही दिवस लोटल्यानंतरही प्रशासनाने पेट्रोल पंप, राज्य परिवहन महामंडळाच्या बसवर, एअरपोर्ट याठिकाणी नरेंद्र मोदी यांचे पोस्टर्स लागल्याची तक्रार केली.  त्याचसोबत राहुल गांधी यांच्याबद्दल भाजप नेत्यांकडून अश्लील टीका करण्यात येते तसेच, काही मुद्द्यांवर काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आला आहे.

बॅनर्स हटविण्याची काँग्रेसकडून मागणी 

आज रात्रीपर्यंत देशभरातील पॅट्रोल पंपावर, एअरपोर्टवर नरेंद्र मोदी यांचे किती पोस्टर्स लावण्यात आलेत, पोस्टर्स हटविण्यासाठी यंत्रणा सुरु आहे का याबाबत सविस्तर अहवाल मागवू तसेच राहुल गांधी यांच्या विरोधात केलेल्या अश्लिल टिकेवर रेकॉर्ड मागवण्यात येत आहे असे आश्वासन केंद्रीय निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिले. यापुर्वी दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीने आपचे नेते अरविंद केजरीवाल आणि नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. पॅट्रोल पंप, मेट्रो स्टेशन, रुग्णालये, सार्वजनिक वाहतूक ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच दिल्ली सरकारचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. हे बॅनर्स हटविण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली.


हे ही वाचा – आचारसंहिता भंग करणाऱ्यांविरोधात अॅपवर करा तक्रार

First Published on: March 15, 2019 7:16 PM
Exit mobile version