‘दिग्विजय सिंहांच्या तोंडाला झालाय गुप्तरोग’

‘दिग्विजय सिंहांच्या तोंडाला झालाय गुप्तरोग’

मध्यप्रदेशमधील भाजप नेते गोपाल भार्गव यांनी काँग्रेस नेते दिग्विजय सिहं यांच्याविरोधात एक वादग्रस्त विधान केलं आहे. दिग्विजय सिहं यांनी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला ‘दुर्घटना’ म्हटल्यानंतर, त्यांच्यावर सर्वच स्तरांतून टीका केली जात आहे. याच धर्तीवर गोपाल भार्गव यांनीही त्याच्यावर निशाणा साधला आहे. ‘दिग्विजय सिंह यांच्या बोटाला आणि तोंडाला गुप्तरोग झाला असून भारताविरोधात विधान केल्याशिवाय त्यांना जेवण जात नाही’ अशी घणाघाती टीका भार्गव यांनी केली आहे. दिग्विजय सिंहांनी काही दिवसांपूर्वी एका ट्वीटमध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा ‘दुर्घटना’ असा
उल्लेख केला होता. याट्वीटचा दाखला देत भार्गव म्हणाले की, ‘दिग्विजय सिंह यांच्या बोटाला आणि तोंडाला गुप्तरोग झाला असून जोवर ते मोबाईलवर बोटं चालवत नाही आणि तोंडातून भारताविरोधात विधान करत नाहीत, तोपर्यंत जेवण जात नाही’.

याची सुरुवात केली ती माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी. सिब्बव यांनी भाजप सरकारकडे एअर स्टाईकचे पुरावे मागितले. त्यानंतर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनीही एअर स्ट्राईकविषयी संशय व्यक्त केला. याविषयी ट्वीट करत सिंह म्हणाले होते की, ‘पुलवामातील दुर्घटनेनंतर आपल्या हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकबद्दल परदेशी प्रसारमाध्यमांकडून शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यामुळे भारत सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे’. सिंह यांच्या याच ट्वीटवरुन आणि विशेषत: पुलवामा हल्ल्याला दुर्घटना म्हटल्याच्या मुद्द्यावरुन त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका केली जात आहे.

First Published on: March 8, 2019 12:42 PM
Exit mobile version