घरदेश-विदेशएअर स्ट्राइकवर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केले वादग्रस्त वक्तव्य

एअर स्ट्राइकवर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केले वादग्रस्त वक्तव्य

Subscribe

पाकिस्तानवर भारताने केलेल्या एअर स्ट्राइकचे पुरावे काँग्रेसचे विरष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी मागितले आहेत. त्याच्या वादग्रस्त विधानामुळे आता राजकीय वर्तुळ तापणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भारतावर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी एअर स्ट्राइककेली होती. या एअर स्ट्राइकची चर्चा देशभरात सुरु असतानाच मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पाकिस्तानातील बालाकोट परिसरात एअर स्ट्राइक केल्याचे पुरावे मागितले आहे. ज्या प्रकारे अमेरिकेने लादेवर कारवाई केली होती. या कारवाईचे त्यांनी पुरावेही दिले होते त्याच प्रकारे भारतानेही एअर स्ट्राइकचे पुरावे देणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. सिंह यांनी भारताने केलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. यापूर्वीही मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी सर्जिकल स्ट्राइकबद्दल वादग्रस्त विधान केले होते. भाजपने सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे द्यावे अशी मागणी निरुपम यांनी केली होती. या मागणीनंतर निरुपम सोशल मीडियावर ट्रोल झाले होते.

काय म्हणाले सिंह

“मी सेनेच्या कारवाईवर कोणताही प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही. आपण केलेली कारवाई लपवणे बरोबर नाही. उपग्रहांच्या माध्यमातून सर्व चित्र स्पष्ट होते. ज्या प्रकारे अमेरिकेने केलेल्या कारवाईचे फोटो जगासमोर प्रकाशित केले तसेच फोटो किंवा पुरावे आपणही जगा समोर मांडणे आवश्यक आहे. मी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे आभार मानतो. अभिनंदला पुन्हा पाठवण्याचा त्यांचा निर्णय हा चांगला होतो. मी त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करतो.” – काँग्रेस नेते दिग्विजय सिंह

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -