सावरकरांच्या वक्तव्यावरून भाजपने राहुल गांधींना घेरलं, अनुराग ठाकूरपासून अनेक मंत्र्यांची जोरदार टीका

सावरकरांच्या वक्तव्यावरून भाजपने राहुल गांधींना घेरलं, अनुराग ठाकूरपासून अनेक मंत्र्यांची जोरदार टीका

Rahul Gandhi on Inflation in India

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेत्यांसह विरोधी पक्षनेते मोदी सरकारविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे अनेक नेत्यांनी सांगितले. तर दुसरीकडे खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत आपल्यावर संसदेत खोटे आरोप झाल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, सावरकरांच्या वक्तव्यावरून भाजपने राहुल गांधींना घेरलं. यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली.

राहुल गांधी हे त्यांच्या स्वप्नातही ‘वीर सावरकर’ होऊ शकत नाहीत. वीर सावरकरांसारखे स्वातंत्र्यसैनिक कधीच परदेशात महिनोनमहिने राहिले नाहीत किंवा त्यांनी स्वतःच्या देशाविरुद्ध इतर देशांची मदत घेतली नाही. सावरकर होण्यासाठी जिद्द आणि देशभक्ती लागते, असं माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले.

काँग्रेस नेत्याला अंदमान तुरुंगात वेळ घालवू द्या: गजेंद्र सिंह शेखावत

केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत म्हणाले की, राहुल गांधींना जर खरोखरच सावरकरांना जाणून घ्यायचे असेल तर त्यांनी अंदमानच्या तुरुंगात जावे आणि सावरकर कोण होते आणि त्यांनी कशाप्रकारे बलिदान दिले, हे समजून घेण्यासाठी तेथे वेळ घालवला पाहिजे.

ते काय म्हणतात ते समजत नाही: जी किशन रेड्डी

काँग्रेस नेते काय बोलतात ते समजत नाही, असा आरोप केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांनी केला. ते म्हणाले की, अशा वादग्रस्त भाषणांमुळे राहुल गांधी यांना न्यायालयाच्या निर्णयानंतर लोकसभा खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आले आहे.

भारतातील लोक त्यांचा न्याय करतील : हरदीपसिंग पुरी

राहुल गांधी यांची लोकसभेतून अपात्रता आणि अदानी मुद्द्यावरून काँग्रेसच्या वाढत्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी म्हणाले की, तुम्ही मर्यादेच्या सीमा पार केल्या आहेत. राजकीय व्यवस्थेत आणि कायदेशीर व्यवस्थेत काय स्वीकारार्ह आहे. राहुल गांधी यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्यांना वीर सावरकरांसारख्या लोकांचे योगदान माहीत आहे का? घोड्यांच्या शर्यतीत गाढव चालवण्यासारखे आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर केंद्र सरकारने त्यांना दुसरा आणि मोठा धक्का दिला आहे. राहुल गांधींना आता सरकारी बंगला सोडावा लागणार आहे. त्यांना तशी नोटीस देखील बजावण्यात आली आहे. त्यामुळे राहुल गांधींना आपलं बिऱ्हाड दुसरीकडे हलवावं लागणार आहे. ही नोटीस आल्यानंतर काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे.


हेही वाचा : केंद्र सरकारचा मोठा धक्का, खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी बेघर होणार?


 

First Published on: March 27, 2023 10:36 PM
Exit mobile version