‘काँग्रेसने इतक्या खालच्या पातळीवर राजकारण करु नये’

‘काँग्रेसने इतक्या खालच्या पातळीवर राजकारण करु नये’

गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे

राफेल करारावरुन पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. बुधवारी सकाळी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन मनोहर पर्रिकर यांच्या बेडरुममध्ये राफेल घोटाळ्याचे रहस्य असल्याचे म्हटले आहे. यावेळी त्यांनी एक कथित क्लीप देखील सादर केली. ही क्लीप गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांची असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर, रोणे यांनी काँग्रेसचे सर्व आरोप फेटाळले आहेत. काँग्रेसने इतक्या खालच्या पातळीवर राजकारण करु नये असा सल्ला देखील त्यांनी काँग्रेसला दिला आहे.

हेही वाचा – ‘मनोहर पर्रिकर यांच्या बेडरुममध्ये राफेल घोटाळ्याचे रहस्य’

नेमकं काय म्हणाले राणे?

विश्वजित राणे यांनी काँग्रेसच्या सर्व आरोपांना फेटाळले आहे. काँग्रेस सोडून मी भाजपममध्ये प्रवेश केला. त्यामुळे मला टार्गेट केले जात आहे, असे स्पष्टीकरण राणे यांनी दिले आहे. त्याचबरोबर काँग्रेसने इतक्या खालच्या पातळीवर राजकारण करु नये, असे देखील राणे यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी राफेल करारासंबंधात कधीही कोणतेही विधान केलेले नाही. ही क्लीप छेडछाड करुन तयार करण्यात आली असल्याचे राणे म्हणाले आहेत.


काँग्रेसने ऑडिओ केला व्हायरल 

दरम्यान काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन कथित व्हिडिओ क्लीप शेअर केली आहे.


हेही वाचा – ‘राफेल करारामध्ये ३६ हजार कोटींचा घोटाळा’

First Published on: January 2, 2019 2:48 PM
Exit mobile version