घरदेश-विदेश'मनोहर पर्रिकर यांच्या बेडरुममध्ये राफेल घोटाळ्याचे रहस्य'

‘मनोहर पर्रिकर यांच्या बेडरुममध्ये राफेल घोटाळ्याचे रहस्य’

Subscribe

मनोहर पर्रिकर यांच्या बेडरुममध्ये राफेल घोटाळ्याचे रहस्य असल्याचा दावा काँग्रेसने केली आहे. यासंबंधी एक ऑडिओ क्लीप कॉग्रेसच्या प्रवक्त्यांनी सादर केला आहे. यामध्ये देशाचे तत्कालीन केंद्रिय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आपल्या बेडरुममध्ये राफेल कराराचे कागदपत्रे असल्याचे म्हणत आहेत, असा दावा काँग्रेसने केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राफेल घोटाळा चांगलाच चर्चेत आहे. राफेल घोटाळ्यावरुन काँग्रेसकडून भाजपवर आरोप केले जात आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी याप्रकरणी पंतप्रधान नेरंद्र मोदी यांना ‘चौकीदार ही चोर है’ असे म्हटले होते. आता याच मुद्यावर काँग्रेसने पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे तत्कालीन केंद्रिय संरक्षण मंत्री मनमोहर पर्रिकर यांच्यावर निशाना साधला आहे. राफेल घोटाळ्याचे रहस्य मनोहर पर्रिकर यांच्या बेडरुमध्ये असल्याचा दावा काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाल यांनी केला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

राफेल घोटाळ्यासंबंधी मोठी माहिती मनोहर पर्रिकर यांच्याकडे आहे असा दावा रणदीप सुरजेवाल यांनी केला आहे. सुरजेवाल यांनी यावेळी एक ऑडिओ क्लीप सादर केली आहे. ही ऑडिओ क्लीप गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजित प्रतापसिंह राणे यांची असल्याचे सुरजेवाल यांनी म्हटले आहे. या ऑडिओ क्लीपमध्ये मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या बेडरुममध्ये राफेल घोटाळ्यासंबंधी माहिती असल्याचे ते स्वत: म्हणत आहेत. पर्रिकर राणे यांच्यासोबत फोनवर बोलत आहेत. यावेळी पर्रिकर म्हणाले आहेत की, मला कोणीही काही करु शकत नाही. माझ्याकडे राफेल घोटाळ्याची माहिती आहे. माझ्या घराच्या बेडरुममध्ये राफेल कराराचे कागदपत्रे आहेत, असे पर्रिकर म्हणाले आहेत. ही ऑडिओ क्लीप केव्हाची आहे, याबाबत सुरजेवाल यांनी स्पष्टीकरण दिलेले नाही. परंतु, याबाबत चौकशी व्हावी, अशी मागणी सुरजेवाल यांनी केली आहे.

- Advertisement -


हेही वाचा – ‘राफेल करारामध्ये ३६ हजार कोटींचा घोटाळा’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -