‘संसदेत जे ऐकण्यास तयार नाहीत, त्यांना उत्तर काय देणार’ मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

‘संसदेत जे ऐकण्यास तयार नाहीत, त्यांना उत्तर काय देणार’ मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

जे संसदेच्या सभागृहात बसत नाही त्याला मी काय उत्तर देऊ. केंद्र सरकारवर टीका करणाऱ्या राहुल गांधींच्या आरोपांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया आहे. जो ऐकत नाही आणि सभागृहात बसत नाही त्याला उत्तर देऊ शकत नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. राहुल गांधी यांनी संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर बोलताना केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. भाजपला अनेक प्रश्न करुन राहुल गांधींनी कोंडी केली होती. यावर मोदींनी पलटवार केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये काँग्रेसवर निशाणा साधला आहे. तर देशातील प्रश्नांवर प्रतिक्रिया दिली आहे. उत्तर प्रदेशसह 5 राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुका, राजकीय कुटुंब, लखीमपूर घटना यासह विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यादरम्यान त्यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधींनी बेरोजगारी आणि भारत-चीन मुद्द्यावरून केंद्रावर केलेल्या टीकांवरही उत्तर दिलं आहे. मोदी म्हणाले, मी प्रत्येक विषयावर तथ्यांसह बोललो. त्याच वेळी, इतर काही बाबींवर आमचे परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. याशिवाय आवश्यक तेथे निवेदनेही दिली. पण अशा माणसाला मी कसे उत्तर देऊ, जो सभागृहात बसत नाही असा टोला मोदींनी लगावला आहे.

भाजप सरकार संवादावर विश्वास ठेवते आणि कोणावरही हल्ला करत नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. संसदेत चर्चेदरम्यान अनेकदा वाद-विवाद होतात, मी त्याचे स्वागत करतो. यावर रागावण्याचा प्रश्नच येत नाही.

पंजाबमधील सुरक्षा व्यवस्थेबाबत मौन कारण..

पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमध्ये सुरक्षा व्यवस्थेमध्ये झालेल्या चुकीवर अद्याप कोणतेही वक्तव्य केलं आहे. यावर त्यांनी माहिती दिली आहे. पंजाबमध्ये घडलेल्या घटनेबाबत सर्वोच्च न्यायालयाची समिती चौकशी करत आहे. अशा परिस्थितीमध्ये माझे कोणतेही वक्तव्य कारवाईवर परिणाम करेल आणि हे बरोबर नाही. जे काही असेल ते चौकशीमध्ये समोर येईल तोपर्यंत आपल्याला त्याची वाट पाहावी लागेल असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

भाजपकडून तपास यंत्रणांचा गैरवापर

केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन भाजप विरोधकांवर कारवाई करण्यात येत असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. मोदी म्हणाले की, भ्रष्टाचार देशाला वाळवीप्रमाणे पोखरत चालला आहे. जर आता मी काही केलं नाही तर जनता मला माफ करेल का? सरकारला कुठून माहिती मिळाली तर त्यांच्यावर कारवाई व्हायला नको का? अशी कारवाई होत असेल तर कौतुक व्हायला पाहिजे. निवडणुकांच्या वेळी कारवाई का? असा प्रश्न करण्यात आला तर यावर मोदी म्हणाले की, आपल्या देशात नेहमीच निवडणुका होत असतात. ईडी-सीबीआय त्यांच्या पद्धतीने कारवाई करत असतात. त्यांच्या कारवाईदरम्यान निवडणुका येत असतात याला ते काय करणार? यंत्रणा आपल्या वेळेनुसार कारवाई करत असतात असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.


हेही वाचा : ह्रदयनाथ मंगेशकरांना आकाशवाणीतून काढलं हे खोटं, संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

First Published on: February 10, 2022 11:04 AM
Exit mobile version