घरताज्या घडामोडीह्रदयनाथ मंगेशकरांना आकाशवाणीतून काढलं हे खोटं, संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

ह्रदयनाथ मंगेशकरांना आकाशवाणीतून काढलं हे खोटं, संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

Subscribe

एखाद्या संगीतकाराला काढल्यानंतर ते गाणं आकाशवाणीवर वाजवणार नाहीत. परंतु आजही ते गाणं आकाशवाणीवर ऐकत असल्याचे राऊत म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी घणाघात केला आहे. लतादीदींच्या निधनानंतर मंगेशकर कुटुंबीयांबाबतच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. काँग्रेसनं गोव्यात सत्ता असताना ह्रदयनाथ मंगेशकरांना आकाशवाणीतून काढून टाकले असल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी संसदेत बोलताना केला आहे. मोदींचा आरोप खोटा असल्याचे अनेक नेत्यांकडून सांगण्यात आले आहे. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीसुद्धा मोदींनी खोटं बोललं असल्याचे सांगितलं आहे. ह्रदयनाथ मंगेशकरांना आकाशवाणीतून काढून टाकले हे खोटं आहे. काढलं असत तर आकाशवाणीमध्ये आताही तेच गाणं वापरण्यात आले नसते.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीतील निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत म्हणाले की, संसदेत खोट बोलण्यात येत आहे. ह्रदयनाथ मंगेशकरांविषयी सांगितले की, वीर सावरकरांबद्दल गाण गायल्यामुळे आणि संगीतबद्ध केल्यामुळे त्यांना नोकरी गमवावी लागली. माझ्या आयुष्यामध्ये जेव्हापासून कळायला लागले तेव्हापासून मंगेशकरांचे गाणं हे आकाशवाणीवर ऐकले आहे. हे गाणं प्रसिद्ध करण्याचे कामही आकाशवाणीने केले आहे. माणसाने किती खोटं बोलावे आणि विशेषता घटनात्मक पदावर राहिलेल्या व्यक्तीने तरी किती खोट बोलावे.. मी पंतप्रधानांना वंदन करतो असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

- Advertisement -

ऑल इंडिया रेडीओचे प्रमुख आहेत महेश केळूसकर यांचे निवेदन ऐकले त्यांनाही आश्चर्य वाटले आहे. एखाद्या संगीतकाराला काढल्यानंतर ते गाणं आकाशवाणीवर वाजवणार नाहीत. परंतु आजही ते गाणं आकाशवाणीवर ऐकत असल्याचे राऊत म्हणाले.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत बोलताना मंगेशकर कुटुंबाचा उल्लेख केला. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाने देशाचे मोठे नुकसान झाले आहे. मंगेशकर कुटुंब हे गोव्याचे असून लता मंगेशकर यांचे धाकटे बंधू आहेत. ते गोव्याचा गौरव आणि गोव्याचे भूमिपूत्र आहेत. आकाशवाणीमध्ये काम करत असताना हृदयनाथ मंगेशकर यांना कामावरून काढण्यात आले होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांची कविता त्यांनी आकाशवाणीवर प्रस्तुत केली, हा त्यांचा गुन्हा होता, मंगेशकर कुटुंबाला काँग्रेसने कशी वागणूक दिली हेही देशाला कळायला हवे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : Hijab Row : ‘या’ देशांमध्ये हिजाब परिधान करण्यावर बंदी, मुस्लिम देशांचाही या यादीत समावेश

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -