मध्य प्रदेशात भीषण अपघात; ७ जणांचा जागीच मृत्यू, तीन गंभीर जखमी

मध्य प्रदेशात भीषण अपघात; ७ जणांचा जागीच मृत्यू, तीन गंभीर जखमी

एका भीषण रस्ते अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) घडली. मध्य प्रदेशातील छिंदवाडा (Chhindwara) येथे गुरुवारी अपघात झाला. कोडा मऊहून छिंदवाड्याकडे येणारी बोलेरो गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या खड्ड्यात (big pothole) पडली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि संबंधीत यंत्रणांनी धाव घेत बचावकार्याला सुरूवात केली. (bolero 7 people died in road accident at chhindwara madhya pradesh)

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त गाडीतून नुकताच लग्न झालेले ८ वऱ्हाडी प्रवास करत होते. बोलेरो या गाडीतून हे ८ जण प्रवास करत होते. मात्र प्रवासादरम्यान, बोलेरो समोर दुचाकी आल्याने त्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पडली. बोलेरोचा वेग अधिक असल्याने चालकाला गाडीवर ताबा मिळवता आला नाही. त्यामुळे गाडी थेट खड्ड्यात पडली. त्यामुळे गाडीत असलेल्या ७ जणांना या अपघातात आपला जीव गमवावा लागला.

हेही वाचा – उद्धाटनाआधीच मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका; परवानगी नसताना प्रवास सुरू

दरम्यान, या अपघताची माहिती मिळाल्यावर घटनास्थळी संबंधीत यंत्रणांनी धाव घेत बचाव कार्याला सुरूवात केली. बचावकार्यावेळी या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजले. मात्र, त्या अपघातग्रस्त गाडीत एक प्रवासी गंभीर जखमी होता. त्यामुळे त्याला तातडीने उपचार मिळावे यासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते.

तीन वर्षीय दिपू उर्फ दीपेंद्र इवनती, वलवान इवनती (३२), रामदिन (१९) सुखराम चौरे (४०) सागर उर्फ शिवपाल मंगल (३१) रणजीत बिस्तु उईके (३५) रामनाथ वडील दादुलाल इनवती,

या घटनेतील जखमींची नावे

अजय इवनाती (५), देववती इवनाती, अमर खडाईत (२२), मुन्नालाल कुमरे (१६), रामदास मरकाम (२३) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


हेही वाचा – केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला तरुणांचा विरोध का?

First Published on: June 16, 2022 3:46 PM
Exit mobile version