आसामच्या पूरग्रस्तांना आमीर खानकडून २५ लाखांची मदत

आसामच्या पूरग्रस्तांना आमीर खानकडून २५ लाखांची मदत

गेल्या वर्षी आमिरने त्याचा वाढदिवस माध्यमांसोबत साजरा केला होता

विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसामुळे (Heavy Rainfall) आसामध्ये पुरस्थिती निर्माण झाली होती. जोराच्या वाऱ्यामुळे आसामच्या नागरिकांच्या घराचे नुकसान झाले आहे. तसेच, पुराचे पाणी घराघरांत शिरल्याने जवजीवन विस्कळीत झाले आहे. परिणामी आसामच्या नागरिकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे या आसामच्या पुरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी बॉलिवूड अभिनेत आमीर खान याने पुढाकार घेतला आहे. आमीर खानने पूरग्रस्तांसाठी २५ लाखांची मदत देऊ केली आहे. (Bollywood actor aamir khan donates 25 lakhs to flood victims of Assam)

अभिनेता आमीर खानच्या मदतीची माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी ट्विट करत दिली आहे. तसेच, या ट्विटमधून त्यांनी आमीर खानचे आभार मानले आहेत. त्याशिवाय, “प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता आमीर खान यांनी आपल्या राज्यातील पूरग्रस्तांना मुख्यमंत्री मदत निधीसाठी २५ लाखांचे योगदान देऊन मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या काळजीबद्दल आणि औदार्याच्या कृतीबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो”, असे हिमंता बिस्वा सर्मा यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.

हेही वाचा – आसाममधील पूराचे भीषण संकट काही थांबेना; आत्तापर्यंत १०८ मृत्यू, ३० जिल्हे प्रभावित

आमीर खानच्याआधी अभिनेता अर्जुन कपूर, गायक सोनू निगम, निर्माते भूषण कुमार यांनीही आसाम मधील पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री मदत निधीमध्ये मदत केली आहे. २१ जून रोजी मुखमंत्र्यांनी सोनू निगम याने त्यांना ५ लाखांची मदत केल्याचे स्पष्ट केले होते.

निर्माते भूषण कुमार यांनी देखील मुख्यमंत्री निधीमध्ये ११ लाखांची मदत केली आहे. अर्जुन कपूरने देखील पूरग्रस्तांसाठी ५ लाखांची मदत केली आहे. आसाममध्ये आलेल्या पुरामुळे तब्बल २१ लाख लोकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे. आतापर्यंत १३४ लोकांचा मृत्यू झाला आहे तर १ लाख ९१ हजार १९४ लोकांना ५३८ कॅंप्स मध्ये हलवण्यात आलं आहे.

आसाम राज्य सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहे. गेले कित्येक दिवस आसाम (assam flood) पुराच्या पाण्याखाली आहे. या महाभयंकर पुरामुळे तिथल्या स्थानिकांचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. त्यांच्या खाण्या-पिण्याचे देखील हाल होत आहेत. आसाम वासियांच्या मदतीसाठी निरनिराळ्या उपाययोजना राबवल्या जात आहेत.


हेही वाचा – देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल

First Published on: June 28, 2022 10:04 PM
Exit mobile version