बिग बींनी दिल्या ‘रमजान ईद’ च्या शुभेच्छा, चाहते म्हणाले…

बिग बींनी दिल्या ‘रमजान ईद’ च्या शुभेच्छा, चाहते म्हणाले…

अभिनेते अमिताभ बच्चन

बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप अऍक्टिव्ह असतात. ते नेहमी चालू घडामोंडीवर भाष्य करतात. नुकात्याच एक पोस्ट शेअर करत त्यांनी मुस्लीम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रमजान हा मुस्लीम बांधवांचा पवित्र महिना. या महिन्यात रोजे अर्थात उपवास करण्यासोबतच अनेक गोष्टींची बंधन स्वत:वर घालून घ्यायची असतात.

“तुम्हा सगळ्यांना ईदच्या मनापासून शुभेच्छा. निरोगी आयुष्य,मित्र-परिवार या सगळ्यांसाठी या दिवशी प्रार्थना करा. आपण प्रेम, शांती आणि बंधुभाव यांच्या जोरावर एकमेकांची साथ देऊ”, अशी पोस्ट अमिताभ बच्चन यांनी शेअर केली आहे.

चाहत्यांनी केलं कौतुक

अमिताभ बच्चन यांनी रमजानच्या शुभेच्छा दिल्या नंतर त्यांच्या चाहत्यांनी त्यांचे आभार मानले आहेत. आणि आठवणीने शुभेच्छा दिल्याबद्दल कौतुक केलं आहे. पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांनी त्यांचे आभार मानले आहेत. तसंच त्यांना ईदच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. बिग बी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असून बऱ्याच वेळा ते चाहत्यांशी संवाद साधत असतात. यात सध्या ते जनतेला घरात राहण्याचं आणि काळजी घेण्याचं आवाहन करत आहेत. गेले काही दिवस अमिताभ कोरोना विषयी जनजागृतीदेखील करत आहेत.


हे ही वाचा – अमिताभ – आयुषमान यांच्या ‘गुलाबो सिताबो’ चित्रपटाचे Trailer Out!


 

First Published on: May 24, 2020 4:02 PM
Exit mobile version