ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवल्याची दिली माहिती, तरुणाला अटक

ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवल्याची दिली माहिती, तरुणाला अटक

ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवल्याचा पोलीसांना दिली माहिती

देशातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आणि एतिहासिक वारसा असलेल्या ताजमहाल येथे बॉम्ब ठेवला असल्याच्या बातमीने खळबळ माजली होती. अज्ञात व्यक्तीने बॉम्ब ठेवला असल्याची माहिती मिळताप पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली होती. गुरुवारी सकाळी ७.३० वाजता स्फोटक ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी ताजमहालच्या परिसरातील सर्व भागात सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. तसेच ताजमहालमध्ये आलेल्या पर्यटकांना या घटनेची माहिती मिळताच मोठा गोंधळ निर्माण झाला होता. आपला जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव सुरु झाली होती. त्यामुळे परिसरात मोठी गर्दीही झाली होती. ताजमहालमधून तब्बल १ हजार पर्यटकांना बाहेर काढण्यात आले आहे.

पोलिसांना ११२ नंबरवर फोन करुन या घटनेची माहिती देण्यात आली होती. पोलिसांकडून माहिती देणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्याचा तपास सुरु आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जवानांची एक तुकडीही ताजमहालच्या परिसरात तैनात करण्यात आली आहे. तसेच बॉम्ब ठेवल्याची माहिती देणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे.

ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळताच ताजमहालसह परिसरातील नागरिकांना खाली करण्यात आले तसेच माहिती बॉम्ब शोधक पथकाकडून बॉम्बचा शोध घेण्यात आला तसेच माहिती देणाऱ्या तरुणाचाही शोध सुरु केला. हा तरुण मुळचा फिरोजाबादचा असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

First Published on: March 4, 2021 11:39 AM
Exit mobile version