Live Update: राष्ट्रीय खाद्यतेल मिशन योजना जाहीर, खाद्यतेलामध्ये आत्मनिर्भर व्हावं – पंतप्रधान मोदी

Live Update: राष्ट्रीय खाद्यतेल मिशन योजना जाहीर, खाद्यतेलामध्ये आत्मनिर्भर व्हावं – पंतप्रधान मोदी

Live update Mumbai Maharashtra

राष्ट्रीय खाद्यतेल मिशन योजना जाहीर करत खाद्यतेलात आपला देश आत्मनिर्भर व्हावा, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना केलं आहे. खाद्यतेलामध्ये आत्मनिर्भरते साठी राष्ट्रीय खाद्यतेल मिशन योजना सुरु करण्यात येत आहे.


पिंपरीच्या कोहिनूर इमारतीत खोदकाम सुरु असताना बॉम्ब सापडला. बॉम्ब नाशक पथक घटनास्थळी दाखल झालं आहे.


१२७ वं घटनादुरुस्ती विधेयक केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री वीरेंद्र कुमार यांनी लोकसभेत पटलावर मांडले. १०२ व्या घटनादुरुस्तीत बदल करून, एसईबीसी प्रवर्ग निर्माण करण्याचे अधिकार राज्यांनाच हे स्पष्ट करणार आता लोकसभेत चर्चा कधी होते हे पाहावे लागेल.

गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत महाराष्ट्रातील भाजपचे प्रमुख नेते दाखल झाले आहेत. या नेत्यांच्या भेटीगाठींचे सत्र सुरु असतानाच आता सोमवारी माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोविड टास्क फोर्ससोबत रात्री साडे आठ वाजता आभासी बैठक घेणार आहेत. निर्बंध शिथिल करण्यावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळतेय.
भारतात गेल्या २४ तासांत ३५,४९९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे; सध्या ४ लाख, २ हजार १८८ सक्रिय रुग्ण आहेत. रिकव्हरी रेट ९७.४० टक्के एवढा आहे.
क्यूआर कोड तपासण्याची जबाबदारी कुणाची? असा सवाल रावसाहेब दानवेंनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. रेल्वे विभागाशी चर्चा करुन उद्धव ठाकरेंनी निर्णय जाहीर करायला हवा होता.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, मुंबईने काल रात्री एका विदेशी नागरिकाला मुंबई विमानतळावरून अटक केली. त्याच्या शरीरातून अंदाजे १ कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या (UNSC) उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षपद भूषवणार आहेत. ‘Enhancing Maritime Security – A Case for International Cooperation’ या सागरी सुरक्षेशी संबंधित खुल्या चर्चेचे आयोजन संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या वतीनं करण्यात आलं आहे.
First Published on: August 9, 2021 1:47 PM
Exit mobile version